Asia Cup IND vs AFG Live esakal
क्रीडा

Asia Cup IND vs AFG : भुवनेश्वरचा पंजा तर विराटचे शतक; भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजय

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 India vs Afghanistan

दुबई : भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा आणि विराट कोहलीचे प्रतिक्षित 71 व्या शतकाच्या जोरावर भारताने आशिया कपमधील आपल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. भारताने आशिया कपचा शेवट गोड केला. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात अवघ्या 4 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 61 चेंडूत नाबाद 122 धावांची तुफानी खेळी केली. त्याला कर्णधार केएल राहुलने 62 धावा करून चांगली साथ दिली. अफगाणिस्तानकडून इब्राहीम झादरानने 64 धावंची झुंजार खेळी करत अफगाणिस्तानला शतक (111) पार करून दिले.

 इब्राहीम जादरानची झुंजार अर्धशतकी खेळी मात्र भारताचा   धावांनी विजय 

अफगाणिस्तानच्या इब्राहीम झादरानने नाबाद अर्धशतकी खेळी करत लाज राखली. मात्र भारताने 101 धावांनी सामना जिंकला.

54-7 : दीपकने दिला सातवा धक्का 

दीपक हुड्डाने 15 धावा करणाऱ्या राशिद खानला बाद करत अफगाणिस्तानला सातवा धक्का दिला.

21-6 : भुवनेश्वर कुमारचा भेदक मारा; अफगाणिस्ताविरूद्ध पंजा

भारताचे 212 धावांचे अवाढव्य आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या अफगाणिस्ताचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 4 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर अर्शदीप सिंगने 1 विकेट घेतली.

विराट कोहलीने 71 वे शतक 

विराट कोहलीने आपले बहूप्रतिक्षित 71 वे शतक अफगाणिस्तानविरूद्ध ठोकले. हे त्याचे टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. या शतकाच्या जोरावर भारताने 20 षटकात 2 बाद 212 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने 61 चेंडूत 122 धावा चोपल्या. तर ऋषभ पंतने 16 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या.

125-2 : फरीद अहमदने भारताला दिले दोन धक्के

फरीद अहमद मलिकने केएल राहुलला 62 धावांवर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याला पहिल्याच चेंडूवर षटकार मारला मात्र पुढच्याच चेंडूवर फरीदने त्याचा त्रिफळा उडवत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

विराट कोहलीचे तिसरे अर्धशतक, केएल राहुलचेही अर्धशतक 

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरूद्ध यंदाच्या आशिया कपमधील आपले तिसरे अर्धशतक ठोकले. त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर केएल राहुलनेही आपले अर्धशतक 36 चेंडूत पूर्ण केले. या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी रचली.

IND 87/0 (10) : भारतीय सलामीवीरांची दमदार सुरूवात

भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी डावाची दमदार सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या 9 षटकात भारताला 80 धावांपर्यंत पोहचवले.

भारतीय संघात मोठे बदल

भारताने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात मोठे बदल केले आहेत. कर्णधार रोहितला विश्रांती दिली असून केएल राहुल संघाचे नेतृत्व करणार आहे. याचबरोबर युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांना देखील विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी दीपक चाहर, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल संघात आले आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आजच्या सामन्यात आपल्या नेतृत्वात एक बदल केला आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

नाणेफेकीस विलंब होण्याची शक्यता?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र यामुळे नाणेफेकीस उशीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT