india vs pakistan asia cup 2022 
क्रीडा

Asia Cup : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2022 : जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजर सध्या आशिया चषक 2022 वर लागून राहिली आहेत. आशिया कपला टी-20 स्पर्धेस आजपासून सुरुवात होत आहे. ‘यजमान’ श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या लढतीने स्पर्धेचे बिगूल वाजेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी खेळू शकणार नाहीत. मात्र यादरम्यान पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानचा आणखी एक घातक गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यांची पुष्टी केली आहे, खराब फॉर्ममुळे या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या हसन अलीला संघात स्थान देण्यात आले आहे.

दुबईतील रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने गतविजेत्या भारताविरुद्ध आशिया चषक अ गटातील त्यांच्या मोहिमेची सुरुवात केल्यावर क्रिकेट विश्वातील 'सर्वात मोठी स्पर्धा' पुन्हा सुरू होईल. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमधला हा पहिलाच सामना असेल, जिथे पाकिस्तानने भारतावर दहा गडी राखून शानदार विजय मिळवला.

आशिया चषक 2022 साठी पाकिस्तान संघ -

बाबर आझम, शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहनी आणि उस्मान कादिर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT