asia cup 2022 ind vs pak pm narendra modi sharad pawar  sakal
क्रीडा

IND vs PAK : टीम इंडियाच्या विजयात शरद पवार नंतर PM मोदीही सामील केले अभिनंदन

टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून लोक जल्लोष करत आहेत. विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. शरद पवार यांनी आनंदाने उड्या मारत जल्लोष साजरा केला.

Kiran Mahanavar

IND vs PAK Asia Cup : भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आशिया चषक 2022 च्या गट सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला 148 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी दोन चेंडू बाकी असताना पूर्ण केले. हार्दिक पांड्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने तीन विकेट घेण्याव्यतिरिक्त बॅटने 33 धावांचे योगदान दिले.

टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून लोक जल्लोष करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले.

भारतीय संघाच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. शरद पवार यांनी आनंदाने उड्या मारत जल्लोष साजरा केला. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शरद पवार विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आशिया चषक 2022 च्या सामन्यात टीम इंडियाने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले. संघाने उत्तम कौशल्य आणि संयम दाखवला. विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन.

अमित शाह यांनी लिहिले, आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाची शानदार सुरुवात. हा अतिशय रोमांचक सामना होता. या शानदार विजयाबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन. असच चालू राहू दे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकांत 147 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने 43 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने चार आणि हार्दिक पंड्याने तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा खडतर सामना 19.4 षटकांत पाच विकेट्स राखून जिंकला. हार्दिकने षटकार मारून सामना संपवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT