Asia Cup 2022 India Vs Pakistan Team India Playing Eleven Prediction  esakal
क्रीडा

Asia Cup 2022 : पाकिस्तानविरूद्ध अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 India Vs Pakistan : भारताचा झिम्बाब्वे दौरा आज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आशिया कपचे वेध लागतील. आशिया कपमध्ये देखील भारताचा पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला खेळवला जाईल. पाकिस्तानने गेल्या वर्षी युएईमध्येच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. आता आशिया कपमध्ये भारताला या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात या सामन्याविषयी तुफान क्रेझ निर्माण झाली आहे. दरम्यान, दोन्ही संघांना या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी दुखापतींचा फटका बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दोघेही दुखापतींमुळे आशिया कप खेळू शकणार नाहीयेत. त्यामुळे भारताची पाकिस्ताविरूद्धची प्लेईंग इलेव्हन कशी असेल याची चर्चा रंगली आहे.

..तर अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन

1 रोहित शर्मा (कर्णधार)

2 केएल राहुल

3 विराट कोहली

4 सूर्यकुमार यादव

5 ऋषभ पंत

6 हार्दिक पांड्या

7 रविंद्र जडेजा

8 भुवनेश्वर कुमार

9 अर्शदीप सिंग

10 युझवेंद्र चहल

11 आवेश खान

या प्लेईंग इलेव्हन नुसार भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात बेंचवर बसावे लागेल. यात फिनिशर दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू आर. अश्विनचा देखील समावेश आहे. याचबरोबर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला आणि टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्यासाठी आपली प्रबळ दावेदारी सादर करणारा दीपक हुड्डा याला देखील पाकिस्तान विरूद्ध अंतिम 11 च्या संघात स्थान मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Money: काळा पैसा भारतात माघारी येणार! केवळ पंधरा दिवसांचा अवधी, परदेशी संपत्तीबाबत सरकारचं मोठं पाऊल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्’'च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

SSC HSC Supplementary Exams : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून सुरू

IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?

महाराष्ट्राचा लाडक्या इन्फ्लुएन्सरसोबत कृष्णाईच्या लेकी’चा विशेष उपक्रम; प्रेमाची सुंदर कहाणी प्रेक्षकांसमोर येणार

SCROLL FOR NEXT