Asia Cup 2022 Ind-Pak sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : Ind-Pak लढत महागडी; तरीही हाऊसफुल्ल

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात चर्चेत असलेल्या भारत-पाकिस्तान लढती सर्वात महागड्या

सुनंदन लेले

Asia Cup 2022 : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात चर्चेत असलेल्या भारत-पाकिस्तान लढती सर्वात महागड्या आहेत; तरीही त्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. तिकीटविक्री सुरू झाल्यापासून अर्ध्या तासात तिकिटे संपली.

स्पर्धेतील इतर सामन्यांची तिकिटे 50 दिरहॅम म्हणजे 1100 रुपयांपासून आहेत आणि भारत पाकिस्तान सामान्यकरिता हेच दर 250 दिरहॅम म्हणजे 5000 रुपयांपुढचे आहेत. महागडी तिकिटे 9000 दिरहॅमला आहेत. तिकीट दर काहीही असले, तरी भारत वि पाकिस्तान सामन्याला भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

दुबईच्या याच मैदानावर पाकिस्तान संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भरताला मोठा पराभवाचा झटका दिला होता. कितीही विसरायचे म्हणाले, तरी पाकिस्तानी खेळाडूंना त्या विजयाचा आधार असणार आणि भारतीय संघाच्या मनात त्या पराभवाची जखम असणार. त्या सामन्याला नाट्यमय कलाटणी देणारा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी स्पर्धेत खेळणार नसल्याने काही फरक पडणार आहे.

क्रिकेट मन जोडणारा दुवा : सकलेन

भारत वि. पाकिस्तान सामन्याकडे लोक फक्त खेळ म्हणून बघतात, ते मला पटत नाही. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या मनात सर्वोत्तम क्रिकेट बघण्याची आस असते. मी भारत आणि पाकिस्तानचे ध्वज एकत्र शिवून प्रेक्षक सामन्याला आलेले बघितले आहेत. त्यात मला प्रेम-आदर दिसला आहे. म्हणून क्रिकेट मन जोडणारा दुवा आहे, असे मला वाटते, असे पाकचा माजी फिरकी गोलंदाज आणि विद्यमान प्रशिक्षक सकलेन मुश्ताक म्हणतात.

उष्णेतेपासून सुटका नाही

दुबईतील तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे. याचा विचार करता सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार 7:30 वाजता) चालू होणार असला, तरी गरम हवेपासून खेळाडूंची सुटका नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Announce : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता, आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Saving Scheme : बायकोसोबत या सरकारी योजनेत करा गुंतवणूक! वर्षाला मिळेल तब्बल 1,11,000 रुपये व्याज; पैसे पूर्ण सुरक्षित

Gondia Crime: मुलगा गेला, नंतर सासऱ्याने सुनेच्या हत्येसाठी रचला कट! LICचे पैसे अन् जमीन हडपण्यासाठीचा काळा डाव उघड?

BMC Election 2026: शिवसेनेच्या अंतर्गत संघर्षाला उधाण, मुंबई वॉर्ड 124 मध्ये राडा, अनेक कार्यकर्ते जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका; सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितला निर्णय; म्हणाली-

SCROLL FOR NEXT