Asia cup 2022 Indian cricket team Virat Kohli and K L Rahul  SAKAL
क्रीडा

Asia cup 2022 : या दोन खेळाडूंचं भविष्य ठरवणारी स्पर्धा

भारताच्या क्रिकेट संघात विराट कोहली व के. एल. राहुल या दोन अनुभवी क्रिकेटपटूंचे पुनरागमन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारताच्या क्रिकेट संघात विराट कोहली व के. एल. राहुल या दोन अनुभवी क्रिकेटपटूंचे पुनरागमन झाले आहे. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर यादरम्यान अमिराती येथे खेळवण्यात येणाऱ्या आशियाई करंडकासाठी अखिल भारतीय वरीष्ठ निवड समितीने सोमवारी टीम इंडियाची निवड केली. जसप्रीत बुमरा व हर्षल पटेल यांची दुखापतीमुळे संघात निवड करण्यात आलेली नाही. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल व दीपक चहर यांना पर्यायी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. दीपक हूडा हा फिरकी गोलंदाजी करू शकतो.

त्यामुळे श्रेयसऐवजी त्याची अंतिम संघात निवड करण्यात आली आहे. तसेच अमिराती येथे फिरकी गोलंदाजांना पोषक अशा खेळपट्ट्या असणार आहेत. त्यामुळे भारतीय संघात चार फिरकी गोलंदाजांना निवडण्यात आले आहे. यामध्ये रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल व रवी बिश्‍नोई यांचा समावेश आहे. भुवनेश्‍वरकुमार, अर्शदीप सिंग व अवेश खान या वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली असून हार्दिक पंड्या हा अष्टपैलू खेळाडू चौथ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकेल. रिषभ पंत व दिनेश कार्तिक या यष्टिरक्षकांनी टीम इंडियातील आपले स्थान कायम राखले आहे. इशान किशन व संजू सॅमसनला बाहेरच ठेवण्यात आले आहे.

दोघांसाठी महत्त्वाची स्पर्धा

विराट कोहली व के. एल. राहुल या दोघांसाठी आशियाई करंडक महत्त्वाचा असणार आहे. इंग्लंडमधील मालिकेनंतर विराटचे पुनरागमन होत आहे. गेल्या काही काळातील त्याची सुमार कामगिरी ही डोकेदुखी ठरत आहे. कर्णधारपद गेल्यानंतर त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच राहुलही आयपीएलनंतर देशासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अर्थात फॉर्मबाबत त्याची चिंता नाही, पण तरीही टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघात चढाओढ लागली आहे. दुखापत व कोरोनावर मात करून संघात परतलेल्या राहुलकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्‍विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्‍नोई, भुवनेश्‍वरकुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान. पर्यायी खेळाडू ः श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT