Asia Cup 2022 Rohit Sharma Commented Yuzvendra Chahal Dhanashree Verma breakup
Asia Cup 2022 Rohit Sharma Commented Yuzvendra Chahal Dhanashree Verma breakup esakal
क्रीडा

VIDEO | Yuzvendra Chahal : युझवेंद्र - धनश्री ब्रेकअप प्रकरणात कर्णधार रोहितची उडी

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2022 Yuzvendra Chahal Rohit Sharma : भारताचा संघ आशिया कपसाठी दुबईत दाखल झाला असून 28 ऑगस्टला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यासाठी टीम इंडिया प्रॅक्टिस सेशनमध्ये चांगलाच घाम गाळत आहे. दरम्यान, सरावावेळीच रोहित शर्माने युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या ब्रेकअप बाबत पत्रकारांना विचारणा केली. ही अफवा कुणी पसरवली असा सवाल करत रोहित शर्माने मैदानावर सराव सत्र कव्हर करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की, चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात ब्रेकअप झाल्याची अफवा कोणी पसरवली. यावेळी युझवेंद्र चहल देखील तेथे उपस्थित होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, रोहितने विचारणा करताच पत्रकारांमधून एक आवाज आला की माझ्या बद्दलो कोणी बोललं तर मी आजच राजीनामा देतो. मी सांगू शकतो की ही अफवा कोणी पसरवली. यावर रोहित शर्माने उत्सुकतेपोटी त्याचे नाव विचारले. त्यावेळी त्याने पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला. मी नाव सांगणार नाही. नाव सांगण बरोबर नाही. मात्र त्या पत्रकाराने सांगितले की नाव नाही सांगणार मात्र तो इथंच आहे. यानंतर रोहित शर्मा आणि युझवेंद्र चहलने पत्रकारांची चेष्टा करण्यास सुरूवात केली.

युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यातील ब्रेकपच्या अफवा जेव्हा धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहल नाव हटवल्यानंतर पसरली. त्यानंतर आनलाईन मीडियामध्ये याबाबतच्या वेगवेगळ्या बातम्यांचा महापूर आला. त्यानंतर हा विषय टीव्ही मीडियाने देखील उचलला. मात्र यानंतर चहलने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत हे प्रकरण शांत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT