asia cup 2022 rohit sharma promo video
asia cup 2022 rohit sharma promo video 
क्रीडा

AsiaCup 2022 पूर्वी हिटमॅन रोहितचा अनोखा अंदाज, प्रोमो झाला व्हायरल

Kiran Mahanavar

Asia Cup 2022 Rohit Sharma Promo Video : टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मिशन आशिया कप 2022 खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवली जाणार होती, मात्र तेथील आर्थिक संकट पाहता ती यूएईमध्ये हलवण्यात आली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या नजरा टीम इंडियावर असावी त्यासाठी अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने आता आशिया कपचा प्रोमो जारी केला आहे.

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे जिथे एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने आता टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मात्र, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान पुढील लक्ष्य आशियाचा चॅम्पियन होण्याचे हे लक्ष्य निश्चित केले आहे. आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ते 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत प्रसारकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आशिया कपच्या प्रोमोमध्ये रोहित शर्मा पूर्णपणे नवीन स्टाईलमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा त्याच्या 45 क्रमांकाच्या जर्सीसह दिसत आहे. रोहित शर्मा म्हणतो, आशिया चषक 7 वेळा उचलून, जगातील नंबर 1 संघ म्हणून ओळखले जात, नवीन विश्वविक्रम केले. पण या सगळ्यात तो अभिमान कुठे आहे, तो अभिमान 140 कोटी भारतीय चाहत्यांच्या तोंडून ऐकताना आहे. तर या अभिमानाच्या बळावर आपण जगावर अधिराज्य गाजवतो. पण त्याआधी आपल्या पुन्हा आशिया खंडावर तिरंगा फडकवायचा आहे.

भारताने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आता रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कप जिंकला तर त्याची हॅट्ट्रिक पूर्ण होईल. भारत 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. 2021 च्या T20 विश्वचषक नंतर दोन्ही संघांची ही पहिलीच आमने सामने असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT