asia cup 2022 shaheen afridi fitness update sakal
क्रीडा

Asia Cup 2022: पाकिस्तानला मोठा धक्का, शाहीन आफ्रिदी बाहेर?

आशिया चषकमध्ये 28 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

Kiran Mahanavar

Shaheen Afridi Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 यूएईमध्ये 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 28 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी तयारी केली आहे, मात्र या सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळावर साशंकता कायम आहे. शाहीन आफ्रिदीला नुकतेच श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही, परंतु तरीही त्याचा आशिया चषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहीन आफ्रिदीच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की शाहीन आफ्रिदीला नेदरलँड्सला नेले जाईल, जेणेकरून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवता येईल. तंदुरुस्त असल्यास नेदरलँड दौऱ्यावरही खेळू शकतो, असे कर्णधार बाबरने सांगितले. आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणार आहे.

आशिया चषकापूर्वी शाहीन आफ्रिदी तंदुरुस्त व्हावे असे पाकिस्तानच्या संघाला आवडेल, कारण पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध 28 ऑगस्टला खेळायचा आहे आणि शाहीन आफ्रिदीची भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. 2021 च्या T20 विश्वचषकात शाहीन आफ्रिदीने भारताच्या टॉप ऑर्डरला केएल राहुल आणि विराट कोहली आउट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT