IPL sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : दुबईतील IPL चा फायदा; चॅम्पियन झाल्यावर कर्णधारने व्यक्त केले मत

आशिया करंडक विजेत्या श्रीलंकेचा कर्णधार शनाकाचे मत

सकाळ वृत्तसेवा

दुबई : आमच्या संघातील काही खेळाडू २०२१ मध्ये दुबईत झालेल्या आयपीएलमध्ये खेळल्याचा फायदा आम्हाला आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवताना झाला, असे मत विजेत्या श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने व्यक्त केले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा २३ धावांनी पराभव करून श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया करंडक उंचावला.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे असते असे बोलले जाते, परंतु २०२१ च्या आयपीएल अंतिम सामन्यात विजेत्या चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावली होती, तरीही कशा प्रकारे सामना जिंकता येऊ शकतो हे धोनीने दाखवून दिले होते. आम्हीसुद्धा तेच उदाहरण डोळ्यासमोर ठेवले असे शनाकाने सांगितले.

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजी दिली. त्यांची ५ बाद ५८ अशी अवस्था झाली होती, परंतु भानुका राजपक्षाच्या शानदार नाबाद ७१ धावांच्या जोरावर श्रीलंकेने ६ बाद १७० अशी भक्कम धावसंख्या उभारली.

दुबईच्या या मैदानावर २०२१ मध्ये १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनीच्या संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली होती. परिस्थिती कशीही असली तरी आव्हानात्मक धावसंख्या कशी उभारता येते हे त्या वेळी चेन्नई संघातील फलंदाजांनी दाखवले होते. आशिया करंडक स्पर्धेचा कालचा अंतिम सामनाही दुबईतील त्याच स्टेडियवर झाला, त्यामुळे आपण चिकाटी ठेवली तर निर्णायक धावसंख्या उभारता येऊ शकते याचा अभ्यास आम्ही केला होता, असे शनाका म्हणाला.

१७० ही धावसंख्या तशी फसवी होती, पण मला माझ्या गोलंदाजांवर विश्वास होता. आपण दडपणाचा कसा सामना करतो हे महत्त्वाचे होते. सुरुवातीला प्रमोद लियानागमागेचा टप्पा भरकटला होता, पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने चार विकेट मिळवून मोहीम फत्ते केली, असे शनाका म्हणाला.

स्पर्धेच्या सलामीला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला आठ विकेटने दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता, पण त्यानंतर पुढचे सर्व सामने जिंकत त्यांनी विजेतेपदाला गवसणी घातली. यात त्यांनी भारताला एकदा, तर पाकिस्तानला दोनदा हरवले.

अफगाणिस्तानविरुद्धचा तो पराभव कोणाच्याही वाट्याला येऊ शकतो, पण त्या पराभवाने आम्हाला खडबडून जागे केले. यातून कसा मार्ग काढायचा यावर विचारविनिमय झाला. संघातील खेळाडूंवर आमचा विश्वास मात्र कायम होता आणि आम्ही सर्व एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो, असे शनाकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

'मेल्यानंतर तरी मला न्याय द्या' अभिनेत्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत केले गंभीर आरोप, जीवन मृत्यूंशी देतेय झुंज

Assembly lobby clash Video: मोठी बातमी! विधानभवनाच्या लॉबीत राडा; पडळकर अन् आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

Latest Marathi News Updates : स्वातंत्र्यानंतर प्रथमच सावित्रीच्या लेकीसाठी धावणार लालपरी

R Madhavan Fitness Secrets: 55 व्या वर्षीही 'जोश' कायम! आर. माधवनचं तरुण दिसण्याचं हे आहे 'अस्सल' सिक्रेट

SCROLL FOR NEXT