Asia Cup 2023 Afghanistan Squad Announced  esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी आणखी एका संघाची घोषणा! 'या' दिग्गज खेळाडूची संघात एन्ट्री

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Afghanistan Squad Announced : यावर्षी आशिया कपचा थरार पाकिस्तान आणि श्रीलंका मध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत कारण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.

आता अफगाणिस्तान संघानेही आशिया कप स्पर्धेसाठी आपला संघाची घोषणा केला आहे. आता फक्त लंकेचा संघ राहिला आहे. अफगाणिस्तान व्यतिरिक्त पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि नेपाळ या देशांनी आधीच आपल्या संघाची घोषणा केले आहे.

करीम जनात आगामी आशिया कपमध्ये धमाका करण्यास उत्सुक असेल. या खेळाडूने एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यासाठी 6 वर्षे वाट पाहिली आहे. डावखुरा फलंदाज हशमतुल्ला शाहिदी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आशिया कप 2023 क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करेल.

आशिया कप 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या यजमानपदी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाईल. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळचा संघ सहभागी होणार आहे.

आशिया कप 2023 साठी अफगाणिस्तान संघ - हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरान, मोहम्मद नबी, करीम जनात, गुलबद्दीन नायब, रशीद खान, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी, फजल हक फारुकी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT