Ind vs SL Asia Cup Final 
क्रीडा

Ind vs SL Asia Cup Final: श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 'या' 2 खेळाडूंवर टांगती तलवार, एकालाच मिळणार संधी

Kiran Mahanavar

Ind vs SL Asia Cup 2023 Final : टीम इंडियाने आशिया कप 2023च्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. या जेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना रविवारी गत-विजेत्या श्रीलंकेशी होणार आहे, ज्याने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारतासाठी ही फायनल खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियाने बर्याच काळापासून कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही. 2018 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला होता, परंतु त्यानंतर टीम इंडियाला एकही बहु-सांघिक स्पर्धा जिंकता आलेली नाही.

याशिवाय, पुढील महिन्यात एकदिवसीय वर्ल्ड कपही सुरू होत आहे, हे लक्षात घेता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या फायनलपूर्वी टीम इंडियाच्या दोन खेळाडू शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल टांगती तलवार आहे.

बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप 2023 च्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात भारताने प्लेईंग-11 मध्ये पाच बदल केले होते. या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केल्यामुळे टीम इंडियाला इतके प्रयोग केल्याचा फटाका बसला आहे. ठाकूर आणि अक्षर दोघेही या सामन्यात खेळले होते.

मात्र, फायनलमध्ये टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध संधी मिळालेल्या खेळाडूंना बाहेर केल्या जाणार आहे. मात्र ठाकूर आणि पटेल यांच्यापैकी एकच बाहेर जाणार आहे. हे दोघेही अष्टपैलू खेळाडूंच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे संघाच्या फलंदाजीला खोली मिळेल. त्यामुळे त्यांच्यात एकजण खेळणार हे निश्चित आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्ध जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली, तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमीची निवड केली. पण बुमराह आणि सिराज अंतिम फेरीत परततील. तसेच कुलदीप यादवही या सामन्यात खेळला नसल्याने त्याचे अंतिम फेरीत पुनरागमनही निश्चित आहे.

रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी तीन फिरकीपटूंसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास अक्षर पटेल खेळणार हे निश्चित आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव असतील. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर अंतिम सामना खेळवला जाणार असून येथे फिरकीपटूंना मदत मिळते.

अशा स्थितीत संघ तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकतो, असे दिसते. या तीन फिरकीपटूंशिवाय भारताकडे बुमराह आणि सिराज असतील. या दोघांशिवाय हार्दिक पांड्याच्या रूपाने तिसरा वेगवान गोलंदाज असेल. पण वेगवान गोलंदाजांना विकेट उपयुक्त असेल तर अक्षरला बाहेर जावे लागेल. त्याच्या जागी ठाकूर खेळेल. ठाकूर खाली उतरून झटपट धावा करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT