Asia Cup 2023 sakal
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया कपवर कोरोनाची छाया! स्पर्धा होणार का रद्द? 4 खेळाडू आले पॉझिटिव्ह

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Four Sri Lankan Players Is Covid Positive : आशिया कप 2023 स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

पाकिस्तानशिवाय आगामी स्पर्धेचे सामनेही श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. यामध्ये 30 ऑगस्ट रोजी मुलतानच्या मैदानावर पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना होणार आहे. दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ 31 ऑगस्ट रोजी पल्लेकेलेच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

श्रीलंकेचा संघ सध्या या स्पर्धेची तयारी करत आहे. दरम्यान अहवालानुसार, दुष्मंता चमीरा आणि वानिंदू हसरंगा यांच्यासह श्रीलंकेच्या संघातील 4 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत आता या खेळाडूंना स्पर्धेत खेळणे कठीण दिसत आहे.

आगामी स्पर्धेसाठी श्रीलंकेने अद्याप संघाची घोषणा केली नाही. अशा परिस्थितीत संघ निवडणे निवडकर्त्यांसाठी सोपे काम होणार नाही. लंका प्रीमियर लीग हंगामातील वेगवान गोलंदाज दुष्मंता चमेरा खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे.

गतविजेता श्रीलंका यावेळी आशिया कप स्पर्धेत ब गटात आहे, ज्यामध्ये त्याला बांगलादेशशिवाय अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. हे सामने जिंकल्यानंतरच संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचू शकेल.

श्रीलंका संघाचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा लंका प्रीमियर लीगदरम्यानही जखमी झाला होता, त्यानंतर तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. श्रीलंकेचा संघ पहिला सामना पल्लेकेले येथे खेळणार आहे, तर दुसरा सामना 5 सप्टेंबर रोजी लाहोरच्या मैदानावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT