Haris Rauf and Naseem Shah 
क्रीडा

Ind vs Pak : भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आजमला बसला मोठा धक्का; दोन स्टार खेळाडू बाहेर?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023: आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान कर्णधार बाबर आजमला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये पाकिस्तानचे स्टार गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आगा सलमानही रूग्णालयात असून तोही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.

पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हारिस रौफ भारताविरुद्ध पहिल्यांदा बाहेर झाला गेला. रौफने राखीव दिवशी गोलंदाजी केली नाही आणि तो मैदानाबाहेर गेला. हाताच्या समस्येमुळे नसीम शाह भारतीय डावाच्या 49व्या षटकात मैदानाबाहेर गेला आणि फलंदाजीसाठी मैदानातही परतला नाही. या दोन्ही खेळाडूंच्या दुखापती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानचे वैद्यकीय पथक दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे.

दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाकिस्तानने बॅकअप खेळाडूंना श्रीलंकेत बोलावले आहे. बॅकअप म्हणून शाहनवाज धानी आणि जमान खान यांना श्रीलंकेत बोलावण्यात आले आहे. हरिस रौफ आणि नसीम शाह यांचे फिटनेस अपडेट मंगळवारी समोर येणार आहे. हे दोन खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्यास शाहनवाज धानी आणि जमान खान यांचा संघात समावेश होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : चुटकीवाला भोंदू मांत्रिकाच्या दरबारावर पोलिसांची धडक कारवाई

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT