Asia Cup 2023 Ind vs SL Suryakumar Yadav 
क्रीडा

Asia Cup 2023 : टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये नसतानाही सूर्यकुमार यादवने जिंकला 'हा' अवॉर्ड

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Ind vs SL Suryakumar Yadav : आशिया कपच्या सुपर-4 फेरीत भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 213 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 172 धावांवर गारद झाला.

दरम्यान सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नसतानाही एक अवॉर्ड जिंकला आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा सूर्यकुमार यादवने पर्यायी क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावली आणि दोन अप्रतिम झेलही घेतले. सूर्याने 40.5 षटकांत घेतलेला झेल पाहून सर्वजण थक्क झाले. या शानदार झेलसाठी सूर्याला सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कार देण्यात आला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने केवळ 213 धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला 172 धावांवर रोखले. रोहित शर्माने 53 धावांची दमदार खेळी खेळली आणि तो भारतासाठी सर्वोत्तम धावा करणारा ठरला. तर भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT