India vs Pakistan Asia Cup 2023 sakal
क्रीडा

Asia Cup 2023: पाकिस्तानकडे BCCIची पाठ! भारताचे सामने UAE, श्रीलंका किंवा इंग्लंडमध्ये

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Pakistan Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाच्या आशियाई करंडकातील लढती पाकिस्तानात खेळवण्यात येणार नाहीत. यासाठी इतर स्थळांचा विचार सुरू आहे. अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्धी माध्यमामधून समोर आले आहे.

यंदा भारतामध्ये एकदिवसीय विश्वकरंडक खेळवण्यात येणार आहे. त्याआधी सप्टेंबर महिन्यात आशियाई करंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. पाकिस्तानला या स्पर्धेच्या आयोजनाचा मान देण्यात आला. मात्र पाकिस्तानात आशियाई करंडक खेळायला जायचे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल, अशी भूमिका बीसीसीआयकडून घेण्यात आली. तसेच आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख जय शहा यांनीही भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले. थोडक्यात बीसीसीआयकडून नकारच सांगण्यात आला.

आता आशियाई करंडकाच्या आयोजनासाठी एका पर्यायावर विचार सुरू आहे. त्यानुसार आशियाई करंडक हा पाकिस्तानातच होईल, पण भारतीय संघ तिथे खेळायला जाणार नाही. भारताच्या लढतींसाठी इतर ठिकाणांचा विचार सुरू आहे. भारताच्या सर्व लढती त्या ठिकाणीच होणार आहेत. पण याप्रसंगी इतर ठिकाणांचे वातावरण, हवामान यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.

चार स्थळांची चाचपणी आली. तसेच आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे प्रमुख जय शहा यांनीही भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले. थोडक्यात बीसीसीआयकडून नकारच सांगण्यात आला.

आता आशियाई करंडकाच्या आयोजनासाठी एका पर्यायावर विचार सुरू आहे. त्यानुसार आशियाई करंडक हा पाकिस्तानातच होईल, पण भारतीय संघ तिथे खेळायला जाणार नाही. भारताच्या लढतींसाठी इतर ठिकाणांचा विचार सुरू आहे. भारताच्या सर्व लढती त्या ठिकाणीच होणार आहेत. पण याप्रसंगी इतर ठिकाणांचे वातावरण, हवामान यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.

भारताच्या आशियाई करंडकातील लढतीसाठी चार स्थळांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामध्ये संयुक्त अमिराती, ओमान, श्रीलंका व इंग्लंड या देशांचा समावेश आहे. आशियाई करंडकासाठी दोन गट तयार करण्यात आले असून एका गटामध्ये भारत, पाकिस्तान यांच्यासह पात्रता फेरीतील एक देश असणार आहे. अन्य गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश असेल. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. त्यानंतर या फेरीतील सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT