Asia Cup 2023 sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठा धोका, जाणून घ्या कारण

सकाळ ऑनलाईन टीम

Asia Cup 2023 India vs Pakistan Weather Report : आशिया कप 2023 यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. या स्पर्धचा थरार 30 ऑगस्टपासून रंगणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानने आयोजित केलेल्या हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाईल.

अशा परिस्थितीत पाकिस्तान 4 सामने आणि उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी उभय संघांमध्ये सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या तयारीसाठी ही स्पर्धा सर्व संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत होणारा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेतील कॅंडी शहराला या सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. मात्र या सामन्यावर पावसाचा धोका आहे.

Accuweather च्या अहवालानुसार, भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पावसाची 40% शक्यता आहे. सामन्याच्या एक दिवस आधीही पावसाची 51% शक्यता आहे.

आशिया कप यावेळी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. लीग टप्पा, सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने खेळवले जातील. आशिया कप 2023 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ मैदानात उतरले आहेत.

भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांना एका गटात ठेवण्यात आले आहे, तर गतविजेत्या श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत.

आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक :

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर

  • भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर

सुपर-4

  • अ 1 विरुद्ध ब 2 - 6 सप्टेंबर

  • ब 1 विरुद्ध ब 2 - 9 सप्टेंबर

  • अ 1 विरुद्ध अ 2 - 10 सप्टेंबर

  • अ 2 विरुद्ध ब 1 - 12 सप्टेंबर

  • अ 1 विरुद्ध ब 1 - 14 सप्टेंबर

  • अ 2 विरुद्ध ब 2 - 15 सप्टेंबर

  • अंतिम सामना - 17 सप्टेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT