Asia Cup IND vs PAK Rain esakal
क्रीडा

Asia Cup IND vs PAK Rain : कँडीवर घोंगावतंय वादळ! भारत - पाकिस्तान सामन्यावर पाणी फिरणार की...

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup IND vs PAK Rain : भारत आणि पाकिस्तान सामन्याची वाट फक्त दोन्ही देशातील चाहतेच नाही तर ब्रॉडकास्टर देखील पाहत आसतात. या दोन ते तीन महिन्यात भारत आणि पाकिस्तान हे अनेकवेळा आमने सामने येणार आहेत. याची सुरूवात उद्या (दि. 2 सप्टेंबर) श्रीलंकेतील कँडी येथू सुरू होणार आहे. मात्र पहिल्याच भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत.

भारत - पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यावेळीत श्रीलंकेतील कँडीला बालागोल्ला वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारत - पाकिस्तान सामन्यांची तिकीटे काही मिनिटातच विकली जातात. हा सामना देखील त्याला अपवाद नाही. मात्र पावसामुळे चाहत्यांची घोर निराशा होण्याची शक्यता आहे. (Asia Cup 2023 India Vs Pakistan Match Weather Update)

भारत - पाकिस्तान हे आशिया कपमध्ये एक नाही तर तब्बल तीनवेळा एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. ग्रुप स्टेज, सुपर 4 आणि फायनल असे तीनवेळा भारत - पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही शेजारी देश फक्त आशिया कप, आयसीसी स्पर्धांमध्येच खेळतात. त्यामुळे या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांचा उड्या पडणे अपेक्षितच असते.

आशिया कपमध्ये 4 सामने पाकिस्तान तर 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. पाकिस्तानमध्ये उद्घाटनाचा सामना झाला आहे. तेथे पावसाचा कोणताही व्यत्यय नव्हता. मात्र भारत - पाकिस्तान सामन्यात पावसाची दाट शक्यता आहे.

या सामन्यात पावसाची शक्यता ही 60 टक्के आहे. पाऊस साधारणपणे संध्याकाळी 5.30 ला सुरू होईल. श्रीलंकेच्या हवामान विभागाने देशाच्या अनेक भागात काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. कँडी हे केंद्रीय प्रांतात येतं. इथं शुक्रवारी आणि शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने बुधवारच्या आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले की, 'पश्चिम, सबरागमुवा, केंद्रीय आणि उत्तरी प्रांतात तसेच गाले आणि मतारा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. हा पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे. पश्चिम,सबरागमुवा प्रांत आणि गाले आणि मतारा जिल्ह्यात जवळपास 75 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्याता आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phone Scam Sangli : फोन आला, वृद्ध घाबरले; सांगलीच्या दोघांना बेकायदेशीर व्यवहाराची भीती घालून ३७ लाखांना लावला चुना

Marathi Movie : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Viral Video : कुत्रा भुंकताच घाबरुन रस्त्यावर पळाला तरुण, समोरुन ट्रक आला अन्..., हृदय पिळवटणारा  व्हिडिओ

Nashik Monsoon : परतीच्या पावसाची आशा: कमी पाऊस झालेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा?

Rajasthan Anti-conversion Law : धर्म लपवून लग्न करताय? आता धर्मांतरासाठी कडक कायदा; जन्मठेपेसह 50 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा

SCROLL FOR NEXT