Asia Cup 2023 India vs Pakistan Weather Update Colombo  
क्रीडा

IND vs PAK Asia Cup 2023 : कोलंबो मधून मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामना पुन्हा होणार रद्द?, जाणून द्या कारण

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 India vs Pakistan Weather Update Colombo : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावासामुळे रद्द करण्यात आला होता. आता आशिया कप स्पर्धेतील 10 सप्टेंबर रोजी होणारा हा सुपर 4 सामनाही पावसामुळे वाहून जाऊ शकतो.

2 सप्टेंबर रोजी पल्लेकेले येथे आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच भिडले होते, तेव्हा तिथे फक्त एक डाव खेळला गेला होता. मुसळधार पावसामुळे सामना रद्द करावा लागला. कोलंबोमध्येही 10 सप्टेंबरला अशीच परिस्थिती असणार आहे. कारण त्या दिवशी हवामान चांगले नाही आणि हीच सर्वात मोठी अडचण आहे.

कोलंबोमध्ये 10 सप्टेंबर म्हणजेच रविवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अपडेट वेबसाइटनुसार, 10 सप्टेंबर रोजी सकाळी कोलंबोमध्ये 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाशात सतत काळे ढग राहतील आणि रात्री मुसळधार पाऊस पडण्याची पूर्ण शक्यता आहे.

आता अशीच स्थिती असेल तर सामना कसा होणार? अशा परिस्थितीत मैदानेही काही करू शकणार नाहीत का? परिणामी, आशिया कप 2023 मधील भारत-पाकिस्तानचा सलग दुसरा सामना रद्द होण्याची पूर्ण शक्यता आहे. पावसाचा धोका केवळ कोलंबो येथे होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावर नाही. पावसामुळे येथे होणाऱ्या भारताच्या आणखी दोन सामन्यांवरही परिणाम होऊ शकतो.

12 सप्टेंबर रोजी येथे होणाऱ्या भारत-श्रीलंका सामन्यावर पावसाचा धोका आहे. त्या दिवशी कोलंबोमध्ये 40 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध भारताच्या सामन्यात मागील दिवसांच्या तुलनेत हवामान थोडे स्वच्छ असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT