Team India sakal
क्रीडा

Team India : BCCI करतंय भेदभाव? हे 5 भारतीय खेळाडू Yo-Yo टेस्ट न देता खेळणार आशिया कप

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Indian cricketers undergo Yo-Yo test : आशिया कप 2023 साठी श्रीलंकेला रवाना होण्याआधी भारतीय संघ अलूरमध्ये तयारी करत आहे. जिथे 6 दिवसीय सराव शिबिराच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट म्हणजेच यो-यो टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये सर्व खेळाडू उत्तीर्ण झाले आहेत.

पण, जसप्रीत बुमराहसह 5 खेळाडूंनी यो-यो टेस्ट दिली नसल्याची बातमी समोर येत आहे. यामागचे कारण काय जाणून घेऊया?

5 खेळाडूंनी का नाही दिली यो-यो टेस्ट?

आशिया कप 2023 पूर्वी एकीकडे 17 सदस्यीय संघातील खेळाडूंनी अलूरमध्ये फिटनेस चाचणी दिली. पण, एका अहवालांवर विश्वास ठेवला तर, या संघात समाविष्ट असलेल्या 5 खेळाडूंनी ही चाचणी दिली नाही. यामध्ये जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (आशिया कपसाठी राखीव खेळाडू) आणि केएल राहुल यांच्या नावांचा समावेश आहे. केएल राहुल सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि संघ व्यवस्थापनाला त्याच्यासोबत काही धोका पत्करायचा आहे. मात्र, त्याने पहिल्या दिवशी जिम सेशनमध्ये भाग घेतला.

जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन यांना यो-यो टेस्टची गरज नव्हती कारण हे सर्व खेळाडू आताच आयर्लंड दौऱ्यावरून परतले आहेत. त्यांनी बंगळुरूला पोहोचताच संघाच्या सराव सत्रात भाग घेतला. त्यामुळे बीसीसीआय काय भेदभाव करत नाही.

एक दिवस आधीच टीम इंडियाने आशिया कपच्या तयारीला सुरुवात केली होती. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पल्लेकलमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.

शुभमन गिल ठरला अव्वल

आशिया कप 2023 च्या आधी टीम इंडियाचे खेळाडू अलूर येथे आयोजित 6 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होत आहेत. ज्यामध्ये, खेळाडूंनी यो-यो टेस्ट दिली. शुभमन गिल ज्यामध्ये अव्वल ठरला. त्याचा यो-यो टेस्ट स्कोअर 18.7 वर आला आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने गुरुवारीच त्याचा यो-यो चाचणीचा स्कोअर शेअर केला, जो 17.2 होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT