Asia Cup 2023 
क्रीडा

Asia Cup 2023 : पाक सुपर-4 मध्ये! नेपाळविरुद्ध सामना पावसाने वाहून गेला तर टीम इंडिया जाणार बाहेर?, जाणून घ्या समीकरण

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्याची मजा पावसाने उधळली. बरेच दिवस चाहते या सामन्याची वाट पाहत होते, पण पावसाने संपूर्ण सामना होऊ शकला नाही. या रद्द झालेल्या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानला 1-1 गुण सामायिक करावे लागले. नेपाळवर विजय मिळवून पाकिस्तानने आधीच 2 गुण मिळवले होते, त्यामुळे ते थेट सुपर 4 मध्ये गेले आहेत. नेपाळविरुद्ध पुढचा सामनाही पावसाने वाहून गेल्यास भारताचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आशिया कप 2023 च्या पहिला सामना भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी होती. भारत-पाक एकदिवसीय क्रिकेट लढतीत भरवशाच्या भारतीय फलंदाजांनी शरणागती स्वीकारली. मात्र इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी लाज राखल्यामुळे भारताला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर आलेल्या पावसामुळे पाकचा डाव झाला नाही आणि हा सामना अनिर्णित राहिला.

पाकिस्तान सुपर-4 मध्ये भारताचे काय होणार?

पावसामुळे पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाला 1-1 गुण मिळाला. पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव करून पाकिस्तानने 2 गुण मिळवले होते, त्यामुळे 3 गुणांसह ते सुपर 4 मध्ये पोहोचले होते.

भारतीय संघाला नेपाळशी खेळायचे असल्याने काळजी करण्यासारखे काही नाही. या सामन्यात पाऊस पडल्यानंतरही भारताला 1 गुण मिळेल. 2 गुण घेऊन भारतीय संघ सुपर-4 मध्ये स्थान मिळवेल. तर नेपाळचा संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडेल.

भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये भिडणार?

आशिया कपचे स्वरूप असे आहे की 6 संघांना 3-3 गटात ठेवण्यात आले आहे. 2-2 संघ पुढील फेरीत पोहोचतील आणि नंतर उर्वरित तीन संघांविरुद्ध 1-1 सामना खेळतील. अ गटातून पाकिस्तान सुपर ४ मध्ये पोहोचला असून भारताचे बाहेर पडणेही निश्चित आहे. त्यामुळे दोघेही 10 सप्टेंबरला पुन्हा एकदा खेळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT