asia cup 2023 pakistan SAKAL
क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 च्या संघात मोठा बदल, 'या' राखीव खेळाडूला मिळाली एन्ट्री

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Pakistan Change in Squad : आशिया कप 2023 पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. 30 ऑगस्टपासून हा थरार रंगणार आहे. जिथे सहा संघांमध्ये सामना रंगणार आहे.

आशिया कप सुरू होण्यापूर्वी एका संघाने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. त्यामुळे राखीवमध्ये बसलेल्या खेळाडूला मुख्य संघात संधी मिळाली आहे. या खेळाडूला आधी या स्पर्धेसाठी राखीव म्हणून घेतले जात होते, मात्र आता बोर्डाने अचानक निर्णय बदलून त्या खेळाडूला मुख्य संघात संधी दिली आहे.

पाकिस्तानने त्यांच्या आशिया कप 2023 संघात एका अतिरिक्त खेळाडूचा समावेश केला आहे. मधल्या फळीतील फलंदाज सौद शकीलचा पाकिस्तानच्या आशिया कप संघात समावेश करण्यात आला आहे, तर तय्यब ताहिरला प्रवासी राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे.

शकील सुरुवातीच्या 17 सदस्यीय संघाचा भाग नव्हता. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी तो संघातील 18 वा सदस्य होता. सुरुवातीला संघात असलेला ताहिर अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एकही सामना खेळला नाही. आता तो आशिया कपदरम्यान राखीव खेळाडू म्हणून संघासोबत प्रवास करणार आहे.

अफगाणिस्तान मालिकेसाठी एकदिवसीय संघात पुनरागमन केलेल्या शकीलने फक्त एक सामना खेळला आणि 9 धावा केल्या आहेत. आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी मुलतानमध्ये नेपाळविरुद्ध होणार आहे.

सोमवारी संध्याकाळी बाबर आझम, इमाम-उल-हक आणि नसीम शाह यांच्यासोबत संघ 27 ऑगस्टला मुलतानला पोहोचेल. याशिवाय आशिया कपमध्ये पाकिस्तानचा सर्वात मोठा सामना भारताविरुद्ध 02 सप्टेंबर रोजी होणार आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील

प्रवासी राखीव: तय्यब ताहिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT