asia cup 2023 pakistan vs sri lanka weather update rain 
क्रीडा

Asia Cup 2023 : कोलंबो मधून पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! Asia Cup मधून जाणार बाहेर?, मोठी अपडेट आली समोर

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. सुपर-4 मधील संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानवर 228 धावांनी मोठा विजय नोंदवला होता.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय फलंदाज विशेष काही करू शकले नाहीत. फिरकी खेळपट्टीवर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारतीय संघ 49.1 षटकात 213 धावा करत सर्वबाद झाला. डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेलालगेने 5 बळी घेतले. भारताच्या सर्व 10 विकेट श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी घेतल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 41.3 षटकांत 172 धावा करून बाद झाला.

सुपर-4 च्या पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. टीम इंडियाने 4 गुणांसह फायनलमध्येही स्थान पक्के केले आहे. बांगलादेशचा संघ आपले दोन्ही सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर-4 मध्ये आतापर्यंत प्रत्येकी 2 सामने खेळले असून प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघांचे 2-2 गुण आहेत, मात्र नेट रन रेटमुळे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

कोलंबामध्ये 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुपर-4 सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने असतील, परंतु Accuweather नुसार, सामन्याच्या दिवशी 93 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीतून बाहेर पडेल. श्रीलंकेचा नेट रन रेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.

पाकिस्तानने सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात भारताकडून 228 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे संघाचा नेट रन रेट -1.892 आहे. दुसरीकडे श्रीलंकेने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला तर भारताविरुद्ध 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्याचा रन रेटही -0.200 आहे, पण तो पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.

अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे 3-3 सामन्यांनंतर 3-3 गुण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT