pcb chief invites jay shah to pakistan to watch opening match of asia cup 
क्रीडा

Asia Cup 2023 : पहिला सामना पाहण्यासाठी जय शाह जाणार पाकिस्तानला? PCBने पुन्हा पाठवले आमंत्रण

Kiran Mahanavar

PCB Invite Jai Shah For Asia Cup Opening Match : अनेक वादानंतर आता आशिया कप 2023 होणार आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाणार असून, पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये 30 ऑगस्टपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय सचिव जय शाह यांना आशिया कप 2023 चा उद्घाटन सामना पाहण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे.

सध्या ही बातमी चर्चेत आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शाह यांना पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण पाठवले आहे. पीसीबीने सांगितले की, शाह व्यतिरिक्त त्यांनी उद्घाटन सामन्यासाठी एसीसीशी संबंधित अनेक बोर्ड अधिका-यांना आमंत्रणे पाठवली आहेत.

सूत्रांवर विश्वास ठेवला तर शाह यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे, परंतु ते पाकिस्तानात येण्याची शक्यता फारच कमी आहे. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी डरबन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत जय शाह यांना पाकिस्तानला भेट देण्याचे तोंडी निमंत्रण दिले होते. यानंतर आता मंडळाने शहा यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे.

जय शाह पाकिस्तानात जाणार का?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जय शाह यांना निमंत्रण पाठवले आहे, मात्र बीसीसीआयचे सचिव पाकिस्तानात जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकिस्तानी माध्यमांवर विश्वास ठेवला तर शाह यांनी पीसीबीचे निमंत्रण स्वीकारले आहे. परंतु एका अहवालानुसार, बीसीसीआयच्या सचिवाने हा दावा साफ फेटाळून लावला आणि त्यांच्या पाकिस्तानात जाण्याची आशा फारशी दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT