Asia Cup 2023 KL Rahul  esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : भारत - पाक सामना अवघ्या दोन दिवसांवर असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का; कोच राहुलने दिली टेन्शनवाली बातमी

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 KL Rahul : आशिया कप 2023 मध्ये भारत आपला पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत खेळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच भारताला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने संघ रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने दुखापतीनंतर संघात परतलेल्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या फिटनेसविषयी माहिती दिली.

द्रविडने दिलेल्या माहितीनुसार संघ राहुल आणि श्रेयसच्या फिटनेसबाबत खूष आहे. सराव सामन्यात दोघांनीही चांगली फलंदाजी केली. मात्र केएल राहुल हा आशिया कपमधील पहिले दोन सामने खेळणार नाहीये.

राहुल द्रविड म्हणाला की, 'केएल राहुलने चांगली फलंदाजी केली आहे. तो विकेटकिपिंग देखील करत आहे. वर्ल्डकपचा विचार करता आम्ही केएल राहुलला दोन सामन्यांचा आराम दिला आहे. यानंतर तो पुनरागमन करले. आम्हाला आशा आहे की तो दोन सामन्यांनंतर पूर्णपणे फिट होईल. याबाबत आम्हाला फारशी चिंता नाहीये.'

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, 'चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाबद्दल खूप चर्चा झाली आहे. गेल्या 18 महिन्यात या क्रमांकावर तीन फलंदाज खेळले आहेत. श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि ऋषभ पंत. दुर्दैवाने दोन महिन्यात तीनही खेळाडू दुखापतग्रस्त झाले.'

राहुल बॅटिंग ऑर्डरमधील सततच्या प्रयोगांबद्दल म्हणाला, 'यामुळेच आम्हाला सतत प्रयोग करावे लागले. तीनही खेळाडूंवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या खेळाडूंना आजमावून पहावं लागलं. आम्हाला वर्ल्डकपसाठी तयार रहायचं होतं. आम्हाला माहिती नव्हतं की वर्ल्डकपमध्ये काय होणार आहे. त्यामुळे आम्ही या स्थानावर दोन ते तीन खेळाडूंचे फलंदाजीचे क्रम सातत्याने बदलले. मुख्य खेळाडू नसेल तर इतर खेळाडूंना संधी द्यावी लागते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

SCROLL FOR NEXT