Asia Cup 2023 
क्रीडा

Asia Cup 2023 : "अरे चाललंय तरी काय..." चालू सामन्यात इशान किशनवर संतापला कर्णधार रोहित

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 : आशिया कप 2023च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा सामना नेपाळशी होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पण टीम इंडियाच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे नेपाळला पहिल्या 20 चेंडूत तीन संधी मिळाल्या. टीम इंडियाचे स्टार क्षेत्ररक्षक विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी नेपाळच्या सलामीवीरांचे सोपे झेल सोडले. यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता.

नेपाळच्या डावातील तिसरा झेल इशान किशनने सोडताच रोहित चांगलाच संतापला होता. इशानने पाचव्या षटकात मोहम्मद शमीच्या चेंडूवर कुशल भुर्तेलचा यष्टीमागे सोपा झेल सोडला. यानंतर रोहितने आपले दोन्ही हात पुढे करून नाराज प्रतिक्रिया दिली. नेपाळला पहिल्या 5 षटकांत तीन संधी मिळाल्यानंतर त्यांची धावसंख्या 10 षटकांपूर्वीच 60 च्या पुढे गेली. जिथे एकीकडे गोलंदाज सतत विकेट्सच्या संधी निर्माण करत होते, मात्र खेळाडूची साथ मिळत नव्हती.

नेपाळचा सलामीवीर कुशल भुर्तेलचा मोहम्मद शमीच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने स्लिपमध्ये सोपा झेल सोडला.

पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कॅच सुटल्यानंतर विराट कोहलीने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक घोडचूक केली. यावेळी आसिफ शेखला जीवदान मिळाले. एवढा साधा झेलही विराट चुकवू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

यानंतर शार्दुल ठाकूरने संघाला पहिले यश मिळवून दिले. शार्दुलने 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भुर्तेलला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. मात्र तोपर्यंत त्याने 38 धावा केल्या होत्या. पहिला सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर टीम इंडियाला नेपाळविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. कारण जर संघ हा सामना हरला तर ते सुपर 4 मध्ये पोहोचू शकणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT