Asia Cup Schedule sakal
क्रीडा

Asia Cup Schedule : आशिया कपच्या शेड्युल मध्ये झालाय मोठा घोळ, फॅन्सना अजूनही सुटले नाही कोडे

सकाळ ऑनलाईन टीम

Asia Cup-2023 Full Schedule : हायब्रीड मॉडेलवर होणाऱ्या आगामी आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळवली जाणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख जय शाह यांनी अधिकृतपणे आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये सामने होणार आहेत. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे.

शेड्युल मध्ये घोळ

आशिया कप-2023 चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील केवळ 4 सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. ग्रुप स्टेजचे 3 सामने आणि सुपर-4 मधील एक सामना पाकिस्तानमध्ये खेळला जाईल. याशिवाय उर्वरित सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. आता A-1, A-2, B-1 आणि B-2 देखील शेड्यूलमध्ये लिहिले आहे जे काही चाहत्यांना समजू शकले नाही.

काय आहे A-1,A-2,B-1,B-2

हे संपूर्ण प्रकरण संघांच्या पात्रतेशी संबंधित आहे. वास्तविक A-1 म्हणजे पाकिस्तान आणि A-2 भारत. श्रीलंका B-1 आणि बांगलादेश B-2 आहे. एसीसीने आधीच स्पष्ट केले आहे की दुसरा संघ अर्थात नेपाळ आणि अफगाणिस्तान पात्र ठरल्यास यात कोणताही बदल होणार नाही. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ पात्रता फेरीत जातील, हे सध्या तरी स्पष्ट आहे.

या वर्षी 5 ऑक्टोबरपासून भारतात आयोजित होणारा एकदिवसीय विश्वचषक 2023 पाहता ही स्पर्धा सर्व संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत होणारा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे, जो श्रीलंकेच्या कॅंडी शहरात होणार आहे. त्याच वेळी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ सुपर-4 साठी पात्र ठरले, त्यानंतर 10 सप्टेंबरला पुन्हा एकदा सामना पाहायला मिळेल.

यावेळी आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळला जाईल. लीग टप्पा, सुपर-4 आणि फायनल असे एकूण 13 सामने होणार आहेत. आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ भाग घेणार आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळचे संघ अ गटात आहेत तर गतविजेत्या श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rivaba Jadeja : रवींद्र जडेजाची पत्नी गुजरातच्या मंत्रीमंडळात, राज्य मंत्री म्हणून घेतली शपथ; कोणतं खातं मिळणार?

Diwali Festival: पशुपक्ष्यांना दिवाळी सण जीवघेणा, फटाके ठरतायत धोक्याचे! पर्यावरणप्रेमींची नागरिकांना हाक

Accident: भीषण! राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाची रिक्षाला धडक, ७ जण गंभीर जखमी, एकाचे दोन्ही पाय तुटले

अदानी समुह RCB चा संघ खरेदीसाठी मैदानात... दिल्ली कॅपिटल्सचे सह मालकही शर्यतीत, सहा तगड्या उद्योगपतींची चर्चा

Terrorist Attack: भारतीय लष्कराच्या छावणीवर हल्ला! चालत्या वाहनातून दहशतवाद्यांचा गोळीबार, कुठे घडली घटना?

SCROLL FOR NEXT