क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कप फायनलआधी 'या' खेळाडूने वाढवले टीम इंडियाचे टेन्शन! संघातून जाणार बाहेर?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Shreyas Iyer : आशिया कपदरम्यान श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. अय्यर सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटच्या मैदानात परतत होता. पण दोन सामने खेळल्यानंतर अय्यरला पुन्हा दुखापत झाली.

आधी तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला होता. यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो श्रीलंकेविरुद्ध खेळू शकणार नसल्याची माहिती मिळाली. खराब फिटनेसमुळे अय्यरला टीम इंडियातील स्थान टिकवणे कठीण झाले आहे.

श्रेयस अय्यरचीही वर्ल्ड कप संघात निवड झाली आहे. अय्यरची खराब तंदुरुस्ती पाहता संघ व्यवस्थापन अन्य पर्यायांचाही विचार करू शकेल, असे दिसत आहे. सध्या सूर्यकुमार यादव बॅकअप पर्याय म्हणून संघासोबत आहे. यासोबतच अय्यर तंदुरुस्त नसल्यास तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यापैकी एकाला वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळू शकते. बीसीसीआयकडे 28 सप्टेंबरपर्यंत संघात बदल करण्याचा पर्याय आहे.

असं असलं तरी श्रेयस अय्यरला परत प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणं जरा कठीण होईल. कारण इशान किशनला काही संधी मिळाल्या आहेत, ज्याचा फायदा त्याने घेतला आहे. किशनने 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 82 धावांची शानदार खेळी केली होती. याआधी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावली होती. त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे त्याला डावलून संघाला अय्यरला संधी देणे सोपे जाणार नाही.

केएल राहुलच्या दुखापतीमुळे अय्यरचे पुनरागमन करणे सोपे झाले. पण आता राहुल केवळ संघात परतला नाही तर तो मुख्य यष्टिरक्षकाची भूमिकाही बजावत आहे. राहुलने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतक झळकावून मधल्या फळीत टीम इंडियासाठी तो इतका महत्त्वाचा का आहे हे सिद्ध केले आहे. किशन आणि राहुल तंदुरुस्त नसेल तरच अय्यरला पुनरागमन करण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT