Sanju Samson sent home from team India Asia Cup squad 
क्रीडा

IND vs SL Asia Cup : सामन्याच्या काही तास आधी टीम इंडियाला मोठा धक्का! BCCI ने दिली मोठी अपडेट

Kiran Mahanavar

Shreyas Iyer Ruled Out Of Super Four Clash Against Sri Lanka : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. बीसीसीआयने एक अपडेट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त झाल्यानंतर तो नुकताच संघात परतला होता.

मार्चमध्ये श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाली होती. मात्र, आता ही समस्या पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अपडेट देताना बीसीसीआयने लिहिले की, श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे, परंतु अद्याप तो पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून आज श्रीलंकेविरुद्ध भारताच्या सुपर-4 सामन्यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही.

आता प्रश्न उपस्थित होत आहे की, जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर 17 सप्टेंबरला होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत तो फिट असेल का? वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियालाही धक्का बसू शकतो. नेपाळविरुद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डायव्हिंग करताना श्रेयसला दुखापत झाली होती.

श्रेयस अय्यरने बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा एक भाग बनवण्यात आले. जेथे त्याने 9 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावांची खेळी खेळली, परंतु हरिस रौफच्या हाती तो झेलबाद झाला.

यानंतर, त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये देखील समाविष्ट करण्यात आले होते. परंतु सामन्याच्या काही तास आधी त्याला मुकावे लागले. त्याच्या जागी केएल राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने नाबाद 111 धावा केल्या, जे त्याचे पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यातील पहिले शतक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT