asia cup 2023 super 4 points table team india qualified for the final 
क्रीडा

Asia Cup 2023 Points Table : भारताची आशिया कप फायनलमध्ये धडक! एक संघ बाहेर, जाणून घ्या इतर दोन संघांची स्थिती

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Super 4 Points Table : भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

टीम इंडियाचा अजून एक सामना बाकी आहे, पण फायनलच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी चांगला असेल. अशा परिस्थितीत, पॉइंट टेबलमधील इतर संघांची काय स्थिती आहे ते जाणून घ्या...

सुपर 4 साठी पात्र ठरलेल्या चार संघांपैकी भारताने अंतिम फेरी गाठली आहे, तर बांगलादेश सलग दोन सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र अजूनही त्यांचा भारताविरुद्ध एक सामना बाकी आहे. जो 15 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.

त्याचबरोबर श्रीलंका आणि पाकिस्तानला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे आणि सुपर 4 मधील प्रत्येकी एक सामना गमावला आहे.

14 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुपर 4 सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेला जिंकण्याची अधिक शक्यता आहे, कारण या संघाला आपल्या परिस्थितीची चांगलीच कल्पना आहे. याशिवाय पाकिस्तान दुखापतींनी त्रस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; SC न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

Maratha Reservation: जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत; मंत्री विखे पाटील, सामंत, देसाईंची चर्चा

Duleep Trophy 2026 : इशान किशनची यष्टीमागे कमाल; वाऱ्याच्या वेगाने केली स्टम्पिंग Video Viral; शाहबाज, घरामीची शतकं...

Marathi News Live Updates : '२४ जिल्हे, २४ संकल्प आणि एक आवाज' या माध्यमातून आम्ही भरती प्रक्रियेतील सुधारणांसाठी आवाज उठवू - देवेंद्र नाथ महतो

‘चॅनेलमधल्या कुणाचातरी राग...’ दयाने सांगितलं CID बंद होण्याचं खरं कारण; म्हणाला-

SCROLL FOR NEXT