Asia Cup 2023 Team India Squad sakal
क्रीडा

Ind vs Pak : पाकविरुद्ध टीम इंडियाचे 'हे' 3 फलंदाज पहिल्यांदाच खेळणार, प्लेइंग 11 मध्ये जागा निश्चित

Kiran Mahanavar

India vs Pakistan Asia Cup 2023 : आशिया कप 2023 आजपासून म्हणजेच 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. आज पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा सामना नेपाळच्या संघाशी होणार आहे. मात्र यानंतर 2 सप्टेंबरला पाकिस्तानी संघ भारताशी भिडणार आहे.

जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कप यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे अनेक खेळाडू पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहेत.

भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलची प्रथमच आशिया कप स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे. गिलने गेल्या 1-2 वर्षात बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. मात्र आजपर्यंत तो पाकिस्तान संघाविरुद्ध एकदाही मैदानात उतरलेला नाही.

गिलने आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1437 धावा केल्या आहेत. आता हा खेळाडू पहिल्यांदाच शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांसारख्या वेगवान गोलंदाजांना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

केएल राहुल आशिया कपमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचा खुलासा टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने केला आहे. अशा परिस्थितीत इशान किशन पाकिस्तानविरुद्ध यष्टीरक्षक म्हणून खेळताना दिसणार आहे. टीम इंडियासाठी 17 वनडे खेळलेला इशान पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बराच काळ संघातून बाहेर होता. ज्यांचा आशिया कप (ODI फॉरमॅट) साठी प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियासाठी 4 नंबरवर अय्यरने अलीकडच्या काळात चमकदार कामगिरी केली आहे. या खेळाडूने 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1631 धावा केल्या आहेत. पण अय्यरही 2 सप्टेंबरलाच पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

आशिया कपसाठी भारताचे संभाव्य प्लेइंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT