Asia Cup 2023 Team India Squad 
क्रीडा

Asia Cup 2023 India Squad : आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा! 'या' दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Team India Squad : प्रतीक्षा संपली. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली, ज्यामध्ये संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरत आहेत. तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

रोहित शर्माशिवाय शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान मिळाले आहे. इशान किशन आणि केएल राहुल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान दिले आहे.

कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांची आशिया कपसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT Study Mode: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ChatGPT मध्ये आला ‘स्टडी मोड’; आता JEE, NEETसह स्पर्धा परीक्षेची तयारी करा मोफत

Latest Maharashtra News Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला, विदर्भाला यलो अलर्ट

Viral Video: नांदेडला भरदिवसा युवतीचे अपहरण; रेल्वेस्थानकासमोरील घटना, व्हिडिओ झाला व्हायरल,पहा नेमक काय घडल

Stock Market Opening: ट्रम्प टॅरिफमुळे शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, कोणते शेअर्स घसरले?

Organ Donation: कैवल्यच्या अवयवदानातून वाचले चौघांचे प्राण; हृदय झेपावले चेन्नईला, एम्समध्ये दोन्ही किडनी दान

SCROLL FOR NEXT