Ravi Shastri sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : रवी शास्त्रीसह 'या' भारतीय दिग्गज खेळाडूंची आशिया कपमध्ये एंट्री!

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Commentators List : आशिया कप 2023 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. या मोठ्या स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ही स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी आशिया कपचे आयोजन हायब्रीड मॉडेलप्रमाणे केले जाणार आहे. चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित सामने श्रीलंकेत होणार आहेत.

2 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानचा सामना रंगणार आहे. त्याच वेळी स्पर्धा सुरू होण्याआधी, त्या मोठ्या नावांची घोषणा देखील केली गेली आहे, जे आपल्या आवाजाने आशिया कप आणखी खास बनवणार आहेत. होय, आम्ही कमेंटेटरबद्दल बोलत आहोत. भारत-पाकिस्तानचे अनेक माजी दिग्गज यंदाच्या आशिया कपमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

आशिया कप 2023 मध्ये, भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरसह रवी शास्त्री, संजय मांजरेकर, इरफान पठाण आणि दीप दास गुप्ता कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. याशिवाय वसीम अक्रम, वकार युनूस, रमीझ राजा आणि बाजिद खान पाकिस्तानकडून कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

बांगलादेशचा अथर अली, तर श्रीलंकेचा रसेल अर्नोल्ड कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस देखील या एक भाग असेल. या दिग्गजांचा आवाज आशिया कप आणखी खास बनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT