Indian Cricket Team
Indian Cricket Team Sakal
क्रीडा

Asia Cup Cricket : पाकिस्तान वर्ल्डकपमधील लढती भारतात खेळण्याची शक्यता कमी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाकमधील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या लढती इतर देशात खेळणार असल्याचे भारताने जाहीर केल्यानंतर पाककडून जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील विश्वकरंडक स्पर्धेतील पाकच्या लढती बांगलादेशमध्ये खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानच्या लढती इतर देशात खेळणे शक्य आहे, असे विधान आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक वसिम खान यांनी केले आहे. पाकमधील आशिया करंडक स्पर्धेबाबत भारताच्या भूमिकेला त्याचप्रमाणे उत्तर दिले जाऊ शकते असेही ते म्हणाले.

विश्वकरंडक स्पर्धा ही आयसीसीची स्पर्धा असून तिची घोषणा आयसीसीकडून जाहीर करण्यात येत असते आणि यंदाच्या एकदिवसीय स्पर्धेचे भारतच यजमान आहे. पाकने कितीही म्हटले तरी ते इतर देशात त्यांचे सामने खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.

...तर आशिया कप इतर देशात?

पाकमध्ये नियोजित असलेली आशिया करंडक स्पर्धा आता पूर्णपणे दुसऱ्या देशात खेळवली जाऊ शकते, अशी धमकी अप्रत्यक्षपणे बीसीसीआयकडून देण्यात आल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT