IND vs PAK sakal
क्रीडा

IND vs PAK : वर्चस्व कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; आज भारत-पाक सामना

गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. आता हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रोहित शर्माचा संघ सज्ज आहे.

सुनंदन लेले

Asia Cup 2022 : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची खरी स्पर्धा आजच्या सामन्यातून सुरू झालेली असली तरी सुपर-४ (अव्वल चार संघ) मधील सर्वात महत्त्वाची लढत अर्थात भारत-पाकिस्तान सामना आज होत आहे. गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. आता हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रोहित शर्माचा संघ सज्ज आहे. त्याच वेळी बाबर आझमचा संघ परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल, मात्र हा सामनाही प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल, यात शंका नसेल.

पहिला सामना अटीतटीचा झाला, ज्यात अगदी शेवटच्या काही चेंडूत हार्दिक पंड्याने डोके शांत ठेऊन भारताला विजयी केले. फरक इतकाच आहे, की हार्दिकला समर्थ साथ देणारा रवींद्र जडेजा गुढघ्याच्या दुखापतीने स्पर्धेबाहेर गेला आहे. जडेजा म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगचे थ्री इन वन पॅकेज असल्याने भारतीय संघाला तो नसल्याची उणीव जाणवेल. डावखुरा फलंदाज संघात असावा, असा विचार झाला, तर रिषभ पंतला संघात जागा द्यावी लागेल. पाकिस्तानसमोर खेळताना ५ नव्हे, तर ६ गोलंदाज संघात असणे गरजेचे असल्याने कदाचित दिनेश कार्तिकवर संघातून बाहेर बसण्याची वेळ येऊ शकते.

भारत आणि पाक दोन्ही संघांना अपेक्षित सुरुवात फलंदाजी करताना मिळालेली नाही. सुपर फोर फेरीत त्याच चौकीवर मार्ग शोधला जाणार आहे. बाबर आझम आणि रोहित शर्मा दोन्ही कप्तानांना बॅटने मर्दुमकी दोन सामन्यात गाजवता आलेली नाही. महत्त्वाच्या सामन्यात दोघेही मोठी खेळी करायला सर्वस्व पणाला लावतील, यात शंका नाही.

पहिल्या सामन्यात ३५; तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ५९ धावा काढल्या आहेत. थोडक्यात विराट कोहलीचा फॉर्म परत आल्याचे सुलक्षण दिसून आले आहे. ‘कोहली म्हणजे फटाक्याची माळ आहे जेव्हा ती पेटत नाही तेव्हा आवाज येत नाही; पण जेव्हा पेटते तेव्हा शेवटपर्यंत वाजत राहते. फॉर्ममध्ये आल्यावर विराट कशी फलंदाजी करू लागतो, याबद्दल भारतीय संघातील एका खेळाडूने प्रतिक्रिया देताना सांगितले.

दुबईच्या मैदानावर नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम गोलंदाजी करेल, असे वाटते; पण पहिली फलंदाजी करतानाही मोठा धावफलक उभारला जाऊ शकतो, असेही गेल्या काही सामन्यात दिसून आले आहे. नाणेफेक कोणीही जिंको; दडपणाखाली पाकिस्तानची गोलंदाजी थोडी गडबड करते, हे लक्षात घेऊन भारतीय फलंदाज दडपण निर्माण करायला आक्रमक खेळी करायच्या विचारात आहेत. सुट्टीचा दिवस असल्याने परत एकदा भारत आणि पाकिस्तानचे चाहते सामन्याचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर घ्यायला गर्दी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न कायम! Goncalo Ramosचा अविश्वसनीय गोल, पोर्तुगालचा नाट्यमयरित्या क्रोएशियावर विजय

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

SCROLL FOR NEXT