Asia Cup India Vs Pakistan : आशिया कपमधील सुपर 4 च्या हाय व्होल्टेज भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावल्यानंतर रवी शास्त्री यांच्याशी संवाद साधला त्यावेळी रोहितने एका गोष्टीची फार डोकेदुखी झाली असल्याचे सांगितले. (Rohit Sharma Says India Playing 11 Selection Is Headache)
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माला रवी शास्त्री यांनी विचारले असता त्याने देखील नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे सांगितले. याचबरोबर तो संघाच्या दुखापतींबाबत बोलताना म्हणाला की, दुखापत अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर आमचे नियंत्रण नाही. जडेजा दुखापतीमुळे बाहेर गेला असून तो मायदेशी परतला आहे.
दरम्यान, रवी शास्त्री यांनी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडणे हा एक मोठा टास्क असतो म्हणाले त्याला जोडून रोहित शर्मा म्हणाला की, हो भारताची प्लेईंग इलेव्हन निवडणे ही डोकेदुखी ठरत आहे. रोहित शर्मा म्हणाला की, भारतीय संघाने आजच्या सामन्यासाठी तीन बदल केले आहेत. विश्रांती दिलेला हार्दिक पांड्या संघात परतला आहे. तर रविंद्र जडेजाच्या जागी दीपक हुड्डा आणि आवेश खानच्या जागी रवी बिश्नोई संघात आले आहेत. ऋषभ पंत विकेटकिपिंग करणार आहे.
पाकिस्तानने संघात एक बदल केला आहे. शाहनवाज दहानीच्या जागी हसन अली संघात आला आहे. तर भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. दीपक हुड्डा संघात आला आहे तर रवी बिश्नोई देखील खेळणार आहे. तसेच हाँगकाँगविरूद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आलेला हार्दिक पांड्या देखील संघात परतला आहे.
भारत सात फलंदाज घेऊन मैदानात उतरणार आहे. याचबरोबर आजच्या सामन्यात तीन फिरकीपटू देखील दिसतील मात्र रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल सोडून दीपक हुड्डाला किती गोलंदाजी मिळेल याबाबत शंका आहे. कारण हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज देखील त्यांचा कोटा पूर्ण करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.