Asia Cup Schedule 2023 sakal
क्रीडा

Asia Cup Schedule 2023: आशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Time Table, Asia Cup Schedule 2023 : आशियाई क्रिकेट परिषदेने बुधवारी आशिया कप 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या भूमीवर या वर्षी ऑगस्टच्या अखेरीस आशिया चषक होणार आहे.

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तान संघाचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामना मुलतानमध्ये 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा पहिला सामना 2 सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानशी होणार आहे.

30 ऑगस्टपासून या स्पर्धेला होणार सुरुवात

आशिया कप स्पर्धेतील दुसरा सामना 31 ऑगस्ट रोजी कँडी येथे बांगलादेशचा श्रीलंकेशी होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडतील. त्यानंतर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ भिडतील. हा सामना 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा दुसरा सामना नेपाळशी 4 सप्टेंबरला कँडीत होणार आहे. दुसरीकडे 5 सप्टेंबरला लाहोरमध्ये श्रीलंकेचा संघ अफगाणिस्तानशी भिडणार आहे.

आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक :

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर

  • भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर

सुपर-4

  • अ 1 विरुद्ध ब 2 - 6 सप्टेंबर

  • ब 1 विरुद्ध ब 2 - 9 सप्टेंबर

  • अ 1 विरुद्ध अ 2 - 10 सप्टेंबर

  • अ 2 विरुद्ध ब 1 - 12 सप्टेंबर

  • अ 1 विरुद्ध ब 1 - 14 सप्टेंबर

  • अ 2 विरुद्ध ब 2 - 15 सप्टेंबर

  • अंतिम - 17 सप्टेंबर

हे संघ दोन्ही गटात आमनेसामने

अ गटात टीम इंडियाशिवाय पाकिस्तान आणि नेपाळचा संघ आहे. त्याचबरोबर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ब गटात आहेत. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर त्यांच्या गटातील एक संघ आणि दुसऱ्या गटातील दोन संघ प्रत्येकी एक सामना खेळतील. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आमनेसामने पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर हे दोन संघ अंतिम सामन्यातही भिडू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT