IND vs PAK sakal
क्रीडा

Asia Cup Schedule 2023: आशिया कपचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानला फक्त 4 सामने, श्रीलंकेत होणार स्पर्धा

Kiran Mahanavar

Asia Cup Schedule 2023 : आशिया चषकाबाबत सुरू असलेल्या अटकळांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आशिया कपचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा दोन देशांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे.

स्पर्धेला 31 ऑगस्टला सुरुवात होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. आशिया चषक हा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळला जाणार असून या अंतर्गत पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळवले जाणार आहेत. श्रीलंकेत 9 सामने होणार आहेत.

यावेळी ही स्पर्धा दोन गटात होणार असल्याची माहिती आशियाई क्रिकेट परिषदेने दिली. दोन्ही गटातील 2-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत खेळतील.

यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक ही सर्व आशियाई संघांसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघही खेळणार आहेत.

पाकिस्तानला मोठा धक्का

पाकिस्तान पहिल्या आशिया चषकाचे यजमान होते, पण बीसीसीआयने टीम इंडियाला तिथे पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर पीसीबीनेही आडमुठी भूमिका घेत ही स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्याचा आग्रह धरला. अखेर बीसीसीआय आणि इतर क्रिकेट बोर्डांच्या दबावापुढे पीसीबीला नमते घ्यावे लागले.

आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे असे म्हणायला हवे, पण त्यापेक्षा दुप्पट सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषकाचा अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे.

आशिया कप भारतासाठी महत्त्वाचा

आशिया कप हा भारतीय क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. यंदाचा विश्वचषक भारतातच होणार असून टीम इंडियाची तयारी कशी आहे, हे आशिया कपमधूनच कळेल. गेल्या वर्षीच्या आशिया चषकात टीम इंडियाची कामगिरी खराब होती. भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात विजेतेपदाची लढत झाली. श्रीलंकेने आशिया कप 23 धावांनी जिंकला. गेल्या वर्षी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT