Asia Cup 2023 Schedule 
क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कपचं गणित बिघडलं; पाकिस्तानात कोणते 4 सामने होणार? समीकरण जाणून घ्या

आशिया कपचा गुंता सुटला?

Kiran Mahanavar

Asia Cup 2023 Schedule : यावर्षी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी ही माहिती दिली. यावेळी आशिया चषक 31 ऑगस्टपासून सुरू होईल, तर अंतिम सामना 17 सप्टेंबरला खेळल्या जाणार आहे.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावेळी आशिया चषक हा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवला जाणार आहे. म्हणजेच या स्पर्धेतील सर्व सामने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवले जातील. मात्र त्याचे यजमानपद पाकिस्तानकडेच राहील.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह एकूण 6 संघांमध्ये 13 सामने खेळवले जाणार आहेत. त्यात फायनलचाही समावेश आहे, जो कदाचित श्रीलंकेत खेळला जाईल. या स्पर्धेत पाकिस्तान मध्ये फक्त 4 सामने खेळल्या जाणार आहे, तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. सर्व 6 संघ दोन गटात विभागले जाणार आहेत.

पण इथे आता एक मोठी बाब गोंधळून गेली आहे की पाकिस्तानमध्ये होणारे 4 सामने कोणते असतील. कारण बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया पाकिस्तानमध्ये आपला एकही सामना खेळणार नाही. तर भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. अशा स्थितीत प्रकरण गुंतागुंतीचे होत असून, आशिया चषक स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच त्यावर तोडगा निघेल.

आशिया चषकाच्या तारखा जाहीर झाल्यामुळे खूश होऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक स्पर्धेचे उद्घाटन सामना पाकिस्तानमध्येच होणार असल्याची माहिती दिली आहे. हे खरे असेल तर पाकिस्तानला घरच्या मैदानावर एकच सामना खेळता येईल. पाकिस्तानने आयोजित केलेले चार सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आयोजित केले जाऊ शकतात.

वास्तविक आशिया कप 6 संघांच्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एकाच गटात असतील. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश दुसऱ्या गटात. अशा स्थितीत पाकिस्तानच्या भूमीवर होणारे 4 सामने काय असतील?

सुरुवातीचे सर्व सामने (ग्रुप स्टेज) पाकिस्तानमध्ये होणार आहेत.

पाकिस्तानमध्ये सुपर-4 चा एकही सामना नाही?

आशिया चषक स्पर्धेतील ग्रुप स्टेज व्यतिरिक्त पाकिस्तानमध्ये सुपर-4 सामना आयोजित करणे खूप कठीण आहे. किंवा असे म्हणता येईल की ते अशक्य आहे. याचे कारण कोणते संघ सुपर-4 मध्ये पोहोचतील आणि कोणते नाही हे आधीच ठरवले जात नाही. अशा स्थितीत सुपर-4 मध्ये कोणता संघ कोणासोबत मुकाबला करेल हे देखील कळत नाही.

पाकिस्तानचा संघही सुपर-4 मधून बाहेर होऊ शकतो. तसेच भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आपला सामना खेळणार नाही. सुपर-4 च्या वेळापत्रकात एक-दोन सामने पाकिस्तानमध्ये ठेवले तरी तो सामना भारतीय संघ खेळणार नाही याची शाश्वती नाही. या सर्व कारणांमुळे पाकिस्तानमध्ये सुपर-4 किंवा फायनल होणे अशक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

Aditya Thackeray: "स्वतःच्या खात्याची माहिती नाही, उत्तर द्यायलाही भीती!" आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सभागृहावर बहिष्कार

Latest Marathi News Live Update : पहिल्याच पावसात एसटीची पोलखोल! नवापूर-नाशिक बसमध्ये छतातून पाण्याचा वर्षाव

लाँच होतीये Motorola Edge 70 Max सिरिज; तब्बल 5 स्मार्टफोनचं पॅकेज, प्रीमियम फीचर्स अन् परवडणारी किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT