vandana-kataria 
क्रीडा

महिला हॉकी संघासमोर चीनही नमले

वृत्तसंस्था

मुंबई - भारताने आशियाई महिला हॉकी क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनचा पराभव केला. गतविजेत्या भारताचा आशियाई महिला चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय. जपानविरुद्धच्या लढतीत भारताच्या गोलात मोलाची कामगिरी बजावलेल्या वंदना कटारियाने दोन गोल करीत भारतास ३-१ असे विजयी केले. 

कोरियातील दाँगही सिटी स्टेडियमवरील या स्पर्धेत भारताने सलामीला जपानला ४-१ असे हरविले होते. तोच जोश कायम ठेवताना वंदनाने चौथ्या आणि अकराव्या मिनिटास गोल करीत भारतास हुकमत मिळवून दिली. पहिल्या सामन्यात हॅटट्रिक केलेल्या गुरजीत कौरने ५१ व्या मिनिटास भारताचा तिसरा गोल केला होता. 

आक्रमण आणि बचावात योग्य सामंजस्य असल्यामुळेच भारतास हुकमत राखता आली. चीनला स्थिरावण्याची संधीही न देता भारताने आक्रमण केले. लिलिमा मिंझ, नवज्योत कौर आणि वंदना कटारियाने चीनच्या बचावफळीवर दडपण आणले. गोलक्षेत्रात नवज्योतने लिलिमाकडे पास केला. आपल्यासमोरील बचावपटूंची कोंडी बघितल्यावर लिलिमाने हुशारीने रिव्हर्स शॉट केला. त्या वेळी चेंडू वंदनाच्या स्टीकला लागून गोलजाळ्यात गेला. सातच मिनिटांत बचावपटूंच्या कोंडीत अडकलेल्या उदिताने हुशारीने चेंडू वंदनाकडे पास केला. वंदनाच्या ताकदवान शॉटने भारताची आघाडी वाढवली. 

जागतिक क्रमवारीत आठवे असलेल्या चीनने चार पेनल्टी कॉर्नर दवडल्यावर पाचव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. पंधराव्या मिनिटास गोलफलक २-१ असे दर्शवत होता. चीनने आक्रमणाचा धडाका दुसऱ्या सत्रात कायम राखला; पण भारताचा बचाव भक्कम होता. तिसऱ्या सत्रात आक्रमण, प्रतिआक्रमणाची चांगली लढाई झाली.

एका गोलची भारताची आघाडी धोक्‍यात आहे, असेच वाटत होते. गुरजितने ५१ व्या मिनिटास मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत भारताचा सलग दुसरा विजय निश्‍चित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT