Asian Boxing sakal
क्रीडा

Asian Boxing : अल्फिया पठाण आशियाई बॉक्सिंग चॅम्पियन

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ८१ पेक्षा अधिक किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्यावर्षी जागतिक युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नागपूरच्या अल्फिया पठाणने अम्मान (जॉर्डन) येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ८१ पेक्षा अधिक किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू होय. अल्फियाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होय.

उपांत्य फेरीत अल्फियाने कझाकस्तानच्या २०१६ च्या विश्वविजेत्या लझ्झत कुंगेबायेवा हिच्यावर ५-० अशी मात केली होती. अल्फियाने लझ्झतवर दुसऱ्यांदा मात केली. गेल्यावर्षी इलरोडो करंडक स्पर्धेतही तिने लझ्झतवर मात केली होती. अंतिम सामन्यात अल्फियाने यजमान जॉर्डनच्या इस्लाम हुसेली हिच्यावर मात केली.

पहिल्या राऊंडच्या शेवटी हुसेलीला पंचांनी अपात्र ठरविल्यानंतर अल्फियाला विजयी घोषित करण्यात आले. भारताचे हे स्पर्धेतील चौथे सुवर्ण व एकूण दहावे पदक ठरले. दरम्यान, टोकियो ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या लोवलिना बोरगोहेन, परवीन हुड्डा, स्वीटी बोरा यांनीही भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. सुवर्णपदकाच्या दृष्टीने भारतीय महिलांची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT