Archery_Asian Games 2023 
क्रीडा

Asian Games 2023: भारताची आणखी एक 'सुवर्ण' कमाई; तिरंदाजीत ज्योती अन् ओजसची कमाल

यामुळं आशियाई खेळांमध्ये भारताच्या नावावर हे १६वं सुवर्णपदक नोंदवलं गेलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Asian Games 2023: आशियाई खेळांमध्ये आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतानं सुवर्णपदकाची कमाई केली. तिरंदाजीच्या कंपाऊंड मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस प्रवीण देवताळे या जोडीनं दक्षिण कोरियाच्या सो चेचान आणि जू जेहून या जोडीचा अंतिम फेरीत १५९-१५८ अशा फरकानं पराभव केला.

यामुळं आशियाई खेळांमध्ये भारताच्या नावावर हे १६वं सुवर्णपदक नोंदवलं गेलं आहे. तसेच भारतानं आशियाई खेळांमध्ये आजवर जिंकलेल्या सुवर्णपदकांशी बरोबरी केली आहे. यापूर्वी जकार्तामध्ये झालेल्या आशियाई खेळात भारतानं ही कामगिरी केली होती.

भारतानं केलं नवं रेकॉर्ड

भारताच्या या दोन तिरंदाजांनी १६ पैकी १४ शॉट्समध्ये १० पॉईंट मिळवले आणि कोरियाला नमवलं. यापूर्वीही याच दोघांनी आशियाई खेळांमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. फायनलमध्ये दोन्ही खेळाडूंनी एकूण १५८ पॉईंट्स मिळवले होते. (Latest Marathi News)

तर कोरियाच्या तिरंदाजांनी १५५ पॉईंट्स मिळवले. यानंतर सहाजिकच भारताचं पारडं जड असल्यानं भारताच्या पारड्यात सुवर्ण पदक पडलं. यानंतर भारताच्या नावावर ७१ मेडल्स झाले आहेत. यापूर्वी भारताचं रेकॉर्ड आशियाई खेळात एकूण ७० मेडल्सचं होतं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT