Asian Games 2023  esakal
क्रीडा

Asian Games 2023 : दहाव्या दिवसाची पदकाने झाली सुरूवात; अर्जुन सिंह - सुनिल सिंहने जिंकले कांस्य

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : भारताने एशियन गेम्स 2023 च्या 10 व्या दिवशी कांस्य पदकाने सुरूवात केली. पुरूष दुहेरी 1000 मीटर कॅनोई क्रीडाप्रकारात भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी भारताला कांस्य पदक पटकावून दिले. या जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत पदकावर कब्जा केला.

भारताने एशियन गेम्स 2023 च्या 10 व्या दिवशी 1000 मीटर कॅनोई (नौकानयन क्रीडाप्रकार) पुरूष दुहेरीमध्ये कांस्य पदक पटकावले. यापूर्वी महिला आर्चरीमध्ये भारताच्या सुरेखा आणि आदिती यांनी आपले क्वार्टर फायनलचे सामने जिंकून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

याचबरोबर या दोघी सेमी फायनलमध्ये एकमेकींविरूद्ध खेळणार आहेत. भारताचे महिला आर्चरीमधील एक रौप्य आणि एक कांस्य पदक निश्चित झाले आहे. भारताचाने पदकांची साठी पार केली असून यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या दिशेने कूच केली आहे. भारताने यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या जकार्ता एशियन गेम्स स्पर्धेत 70 पदके जिंकली होती.

भारताने आर्चरीमध्येही पदक निश्चित केले. महिला वैयक्तिक काम्पाऊंड आर्चरी प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि आदिती गोपिचंद स्वामी या दोघींनीही सेमी फायनल गाठली आहे. विशेष म्हणजे सेमी फायनलमध्ये या दोघी एकमेकींना भिडणार आहेत. त्यामुळे एक कांस्य आणि निदान रौप्य पदक तरी निश्चित झाले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT