asian games 2023 bajrang punia vinesh phogat to lead 18 member wrestling contingent full squad sport Sakal
क्रीडा

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी १८ कुस्तीपटूंची निवड

टोकियो ऑलिंपिक रौप्यपदक विजेता रवी दहिया मात्र स्थान मिळवू शकला नाही.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोप, न्यायालयीन लढाई व त्यानंतर झालेल्या निवडी चाचणीनंतर अखेर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघ निवडण्यात आला. एकूण १८ कुस्तीपटूंची निवड करण्यात आली असून त्यात ग्रीको-रोमन, पुरुष फ्रीस्टाईल व महिला फ्रीस्टाईलसाठी प्रत्येकी सहा खेळाडूंचा समावेश आहे.

कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीच्या देखरेखीखाली शनिवार व रविवारी झालेल्या निवड चाचणीतील कामगिरीच्या आधारावर या खेळाडूंची निवड करण्यात आली. १८ पैकी बजरंग पुनिया (६५ किलो) व विनेश फोगट (५३किलो) यांना चाचणीतून सूट देण्यात आली होती.

त्यांची थेट निवड करण्यात आली. मात्र, दोघांच्या वजन गटातही चाचणी घेण्यात आली असून त्यातील दोन्ही खेळाडूंना स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. टोकियो ऑलिंपिक रौप्यपदक विजेता रवी दहिया मात्र स्थान मिळवू शकला नाही.

कारण ५७ किलो वजन गटाच्या पहिल्याच फेरीत आतिश तोडकरने त्याच्यावर मात केली. मात्र, उपांत्य फेरीत आतिशला राहुलकडून मात खावी लागली. यात अमन सेहरावतने राहुलवर मात करून आशियाई क्रीडा स्पर्धेचे तिकीट मिळविले.

दरम्यान, विनेश व बजरंगला चाचणीत सूट कशी दिली या मुद्यावरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या अंतिम पंघलने ५३ किलो वजन गटात वर्चस्व गाजविले. २० वर्षे वयोगटातील जागतिक विजेती असलेल्या अंतिमने चाचणीतील अंतिम लढतीत मंजूवर मात केली. मात्र, तिला स्टँडबाय राहावे लागेल.

भारतीय संघ ः ग्रीको रोमन - ग्यानेंद्र (६० किलो), नीरज (६७ किलो), विकाश (७७ किलो), सुनील कुमार (८७ किलो), नरींदर चिमा (९७ किलो), नवीन (१३० किलो). महिला फ्रीस्टाईल - पूजा गहलोत (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), मानसी अहलावत (५७ किलो), सोनम मलिक (६२ किलो), राधिका (६८ किलो), किरण (७६ किलो). पुरुष फ्रीस्टाईल - अमन सेहरावत (५७ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), यश (७४ किलो), दीपक पुनिया (८६ किलो), विक्की (९७ किलो), सुमीत (१२५ किलो).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT