Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : चीनचा पुन्हा खोडसाळपणा; अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना नाकारला व्हिसा?

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : यंदाचे एशियन गेम्स हे चीनमधील हांगझहोऊ येथे होत आहे. चीन आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षापासून ताणले आहेत. चीन भारताची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून अनेकवेळा आत घुसरण्याचा प्रयत्न करतोय. चीन अरूणाचल प्रदेशचा भाग आपल्या नकाशात दाखवून खोडसाळपणा देखील करत असतो.

यावेळी चीनने एशियन गेम्समध्येही खोडसाळपणा केला आहे. त्याने भारताच्या तीन वुशू खेळाडूंना चीनमध्ये येण्याची परवानगी दिली नाही. हे तीनही खेळाडू अरूणाचल प्रदेशचे आहेत. त्यांची हांगझहोऊची फ्लाईट मिस झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय वुशू संघातील इतर खेळाडू आणि अधिकारी चीनला रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नयेमन वांगसू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू या आपल्या ट्रॅवल डॉक्युमेंट डाऊनलोड करू शकल्या नाहीत. त्यांना हांगझहोऊ एशियन गेम्स आयोजक समितीने मान्यता दिली असूनही त्यांना ट्रॅवल डॉक्युमेंट मिळाली नाहीत.

हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'एखाद्या खेळाडूला मान्यता पत्र मिळाले म्हटल्यावर ते प्रवास करण्यास पात्र असतात. मात्र आश्चर्यकारकरित्या तीन खेळाडू त्यांची कागदपत्रे डाऊनलोड करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना विमानात बसता आले नाही.'

भारतीय वुशू संघातील इतर खेळाडूंना अशी समस्या आली नाही. भारतीय वुशू संघात एकूण 11 खेळाडू आहेत. या तीन खेळाडूंव्यक्तिरिक्त इतर खेळाडू बुधवारी रात्री हाँगकाँगला रवाना झाले. हाँगकाँगवरून ते हांगझहोऊला कनेक्टेड फ्लाईटने गुरूवारी पोहचले.

यावर्षी जुलै महिन्यात चीनच्या दुतावासाने अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना स्टॅपल्ड व्हिजा जारी केला होता. हे खेळाडू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स खेळण्यासाठी चेंगडू येथे जाणार होते. चीनच्या या निर्णयाच्या विरोधात भारताच्या संपूर्ण वुशू संघाने स्पर्धेतून माघार घेतली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शनिवारी शाळांना, सरकारी कार्यालयांना सुट्टी! ३ दिवस ग्रामीणमधील दारू दुकाने बंद, शहरातील दुकाने राहणार सुरू; झेडपी, पंचायत समितीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान

Breakfast Idea: रोजच्या नाश्त्याला कंटाळा आला? मग बनवा झटपट पावभाजी पराठा, चव लागेल अफलातून!

मोठी बातमी! प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील 11,000 शिक्षक अतिरिक्त; 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाने वाढविली चिंता, नवी शिक्षक भरती १५ जूनपूर्वी...

अग्रलेख : ट्रम्प यांची दैत्यगिरी...

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT