asian games  sakal
क्रीडा

Asian Games 2023 : रोइंगमध्ये पाच पदकांवर मोहोर; दोन ब्राँझपदकांची कमाई

पुरुषांच्या कॉक्सलेस फोर (४) प्रकारात भारताने ब्राँझपदक पटकावले.

सकाळ वृत्तसेवा

हांग्‌ चौऊ - भारतीय खेळाडूंनी रोइंग या खेळामध्ये सोमवारीही दोन पदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी दोन रौप्य व एक ब्राँझ अशी एकूण तीन पदके कमावल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन ब्राँझपदके आपल्या नावावर केली. भारतीयांनी रोइंंग(Rowing) या खेळामध्ये एकूण पाच पदके जिंकली. आता रोइंंग या खेळाच्या क्रीडाशर्यती संपल्या आहेत.

पुरुषांच्या कॉक्सलेस फोर (४) प्रकारात भारताने ब्राँझपदक पटकावले. भारताच्या या संघात जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनितकुमार व आशिष या खेळाडूंचा समावेश होता. भारतीयांनी ही शर्यत ६.१०.८१ अशा वेळेसह पूर्ण करीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी ०६.०४.९६ अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक, तर चीनच्या खेळाडूंनी ०६.१०.०४ अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत रौप्यपदक जिंकले.

यानंतर भारताच्या खेळाडूंनी पुरुषांच्या क्वॉड्रपल स्कल्स या प्रकारात आणखी एक ब्राँझपदक जिंकून दिले. या संघात सुखमीत सिंग, जकार खान, परमिंदर सिंग व सतनम सिंग या खेळाडूंचा समावेश होता. भारतीय खेळाडूंनी ६.०८.६१ अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि तिसरे स्थान मिळवले. चीनच्या खेळाडूंनी ६.०२.६५ अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी ६.०४.६४ अशा वेळेसह शर्यत पूर्ण करीत रौप्यपदकावर नाव कोरले.

पहिल्या दिवशी तीन पदके

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताला रोइंंग या खेळामध्ये तीन पदके मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स व पुरुषांच्या कॉक्स एट (८) या प्रकारांमध्ये रौप्यपदक पटकावण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळाले. तसेच पुरुषांच्या कॉक्सलेस पेयर या प्रकारात भारतीयांनी ब्राँझपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT