Asian Games 2023 esakal
क्रीडा

Asian Games 2023 : आर्चरीमध्ये भारताचे पदक निश्चित; सेमी फायनलमध्ये आदिती - सुरेखा भिडणार

अनिरुद्ध संकपाळ

Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मध्ये आज 10 व्या दिवशी भारताने आर्चरीमध्ये पदक निश्चित केले. महिला वैयक्तिक प्रकारात भारताच्या व्हीजे सुरेखा आणि आदिती या दोघींनीही सेमी फायनल गाठली आहे. विशेष म्हणजे सेमी फायनलमध्ये या दोघी एकमेकींना भिडणार आहेत.

भारताने आज दहाव्या दिवशी महिला वैयक्तिक काम्पाऊंड आर्चरीमध्ये आपली दोन पदके निश्चित केली आहेत. ज्योती सुरेखा वेन्नम आणि आदिती गोपिचंद स्वामी यांच्यातच सेमी फायनलची लढत होणार आसल्याने भारताचे एक रौप्य आणि एक कांस्य पदक निश्चित झाले आहे.

आदिती गोपिचंद स्वामीने दोनवेळा 15 बाणांच्या आतच दोनवेळा अव्वल गुण मिळवत एशियन गेम्समधील रेकॉर्ड ब्रेक केले. तिने राऊंड ऑफ 32 आणि क्वार्टर फायनलमध्ये 149 गुण मिळवले. आज तिचा सामना कझाकिस्तानच्या अदेल विरूद्ध होता.

आदिती आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्यानंतर कॅनोई (नौकानयन) 1000 मीटर पुरूष दुहेरीत भारताने कांस्य पदकाची कमाई केली. अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी 3.53.329 अशी वेळ नोंदवत भारताला कॅनोईमधील पहिले पदक पटकावून दिले. याचबरोबर भारताची पदकसंख्या 61 वर पोहचली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT