odi asian games neeraj chopra pv sindhu Aditi-Prathmesh sports Sakal
क्रीडा

Asian Games 2023:आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला, पदकांच्या यादीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये

भारथीय खेळाडूंची विजयी घौडदौड सुरुचं आहे. भारताने आशियाई खेळाच्या पदकतालिकेत पाचवे स्थान मिळवले आहे.

Manoj Bhalerao

Asian Games 2023:आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. स्पर्धा सुरू होऊन अवघे दोन दिवस उरले असून भारताने यापूर्वीच दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. आता भारताच्या एकूण पदकांची संख्या 11 वर पोहोचली आहे.

तसेच, भारताने आता आशियाई क्रीडा 2023 च्या पदकतालिकेत पहिल्या 5 मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अजूनही अनेक सामने होणार आहेत ज्यात भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकण्याचा दावा करतील.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेत भारत अव्वल पाचमध्ये

एशियन गेम्स 2023 च्या नवीनतम पदकतालिकेबद्दल बोलायचे तर यजमान चीन पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत चीनने 32 सुवर्ण, 15 रौप्य आणि 5 कांस्य पदकं जिंकली आहेत. चीनकडे सध्या एकूण 51 पदकं आहेत. यानंतर कोरिया प्रजासत्ताक दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत त्यांनी सहा सुवर्ण, सात रौप्य आणि 10 कांस्यपदके जिंकली आहेत. जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याच्या नावावर चार सुवर्ण, 12 रौप्य आणि 8 कांस्य पदके आहेत. या देशाने आतापर्यंत एकूण 24 पदके जिंकली आहेत.

उझबेकिस्तानने चार सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 11 पदके जिंकली आहेत. आता हाँगकाँग, चीन आणि भारत पाचव्या क्रमांकावर आहेत. हाँगकाँग चीनने आतापर्यंत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्यपदक जिंकले आहेत. त्यांची एकूण 11 पदके आहेत. भारताचीही तीच अवस्था आहे, त्यामुळेच दोघांना पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. भारतीय खेळाडूंनी येथून अधिक सुवर्णपदके जिंकल्यास पदकतालिकेत आणखी पुढे जाण्याची संधी असेल.

आधी रायफल शुटींग आणि नंतर महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदक

भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्ण पदकाने केली. भारताने 10 मीटर पुरुष रायफल (संघ) मध्ये विश्वविक्रम मोडला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. टीम इंडियाने 1893.7 गुणांसह चीनचा विक्रम मोडला. यानंतर काही वेळातच भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. महिला क्रिकेटमध्ये श्रीलंकेला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर बांगलादेशने पाकिस्तानला हरवून कांस्यपदकावर नाव कोरलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT