Hangzhou Asian Games 2023 Jyothi Surekha Vennam wins gold in Archery Women Compound marathi news  
क्रीडा

Asian Games 2023 : टीम इंडियाला आर्चरीमध्ये ज्योतीने मिळवून दिलं गोल्ड! तर अदितीने जिंकल ब्रॉन्झ

रोहित कणसे

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील भारताची चमकदार कामगिरी सुरूच आहे. आज शनिवारी देखील भारताने भारताची सुरुवात चांगली झाली. तिरंदाजीत कांस्यपदकानंतर भारताने सुवर्णपदक देखील मिळवले आहे.. भारताच्या ज्योती वेन्ननने चमकदार कामगिरी करत तिरंदाजीची अंतिम फेरी जिंकली. दक्षिण कोरियाच्या खेळाडूला हरवून ज्योतीने सुवर्णपदक जिंकले. याआधी अदितीने तिरंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याने टीम इंडियासाठी कांस्यपदक जिंकले होते.

ज्योतीने कंपाऊंड इंडिविजुअल फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या खेळाडूचा149-145 असा पराभव केला. या विजयासह तिने सुवर्णपदक पटकावले. ज्योतीने याआधीही चमकदार कामगिरी केली आहे. तिने कंपाऊंड विमेंन्स टीम इव्हेंटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि भारतासाठी सुवर्ण जिंकले. ज्योतीने मिक्स्ड टीम इव्हेंट जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा प्रकारे ती तीन सुवर्णपदकांची वाटेकरी ठरली आहे. ज्योतीच्या विजयासह भारताने 97 पदके जिंकली आहेत. तर टीम इंडियाची 100 हून अधिक पदके निश्चित झाली आहेत.

भारताच्या शनिवारची सुरुवात कांस्यपदकाने झाली. अदिती स्वामीने कंपाऊंड इंडिविजुअल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. अदितीने इंडोनेशियन खेळाडूचा पराभव केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अदिती अवघ्या 17 वर्षांची आहे आणि तिने अनेकवेळा चमकदार कामगिरी केली आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील टीम इव्हेंटमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले होते.

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय तिरंदाजी संघाने चमकदार कामगिरी केली आहे. टीम इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. अदिती, ज्योती आणि परनीत यांनी चमकदार कामगिरी करत कंपाउंड स्पर्धेत यश संपादन केले. मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये देखील भारताला सुवर्णपदक मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT