IND vs NEP Asian Games 2023 esakal
क्रीडा

IND vs NEP : नेपाळनं भारताला दिली कडवी झुंज; 202 धावा करून देखील विजय फक्त अवघ्या काही धावांचा

India vs Nepal in Asian Games 2023...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NEP Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 मधील भारत आणि नेपाळ यांच्यातील क्रिकेट सामन्यात आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताला चांगलाच धक्का बसला.

यशस्वी जैसवालच्या शतकी खेळी आणि रिंकू सिंहच्या 15 चेंडूत ठोकलेल्या 35 धावांच्या जोरावर भारताने 202 धावा केल्या होत्या. मात्र नेपाळने प्रत्युत्तरात 9 बाद 179 धावा करून भारतीय गोलंदाजांना फेस आणला होता. अखेर अनुभवी आवेश खान आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत भारताची लाज वाचवली. भारताने फक्त 23 धावांनी विजय मिळवला.

भारताचे 2023 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नेपाळने देखील कडवी झुंज दिली. कुशल भर्टेलच्या 28, कुशल मालाच्या 29 आणि दिपेंद्रसिंह ऐरीने 15 चेंडूत केलेल्या 32 धावांच्या जोरावर नेपाळने 15 षटकाच्या आतच शंभरी पार केली.

यानंतर तळातील फलंदाज संदीप जोराने आक्रमक फटकेबाजी करत नेपाळला 150 च्या जवळ नेऊन पोहचवले. अखेर अर्शदीप सिंहने त्याचा अडसर दूर केला. भारताकडून रवि बिश्नोईने 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून शिवम दुबे हा सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला. त्याने 2 षटकात 31 धावा दिल्या.

त्यानंतर शेवटच्या 5 षटकात आवेश खान आणि अर्शदीप सिंहने प्रभावी मारा करत नेपाळच्या फलंदाजांना रोखले. मात्र तरी देखील नेपाळने 175 धावांपर्यंत मजल मारलीच.

तत्पूर्वी, भारतीय पुरूष क्रिकेट संघाने एशियन गेम्स 2023 मधील आपल्या पहिल्या सामन्यात 20 षटकात 4 बाद 202 धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैसवालने 49 चेंडूत शतकी खेळी करत मोठा वाटा उचलला. त्याला ऋतुराजने 25 धावा करून चांगली साथ दिली.

त्यानंतर शिवम दुबेने नाबाद 19 चेंडूत 25 तर रिंकू सिंहने 15 चेंडूत 37 धावांची खेळी करत भारताला 202 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT